नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका

By विश्वास मोरे | Published: January 23, 2024 09:19 AM2024-01-23T09:19:23+5:302024-01-23T09:19:42+5:30

देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावी

Always give power to those who take others to virtue; Criticism by Neelam Gorhe | नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका

नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका

पिंपरी: नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची आजच्या उत्सवाने शक्ती द्यावी, वाईट शक्तींचा विनाश होऊन देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील साई मंदिरास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी भेट दिली.  त्यावेळी त्या बोलत होत्या.  गोऱ्हे यांनी  प्रभू श्रीरामांच पूजन करून, होम हवन केले. याप्रसंगी श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट, वडमुखवाडी विश्वस्त आणि अध्यक्ष सुभाष नेलगे, शिवकुमार नेलगे, मंदिराचे पुजारी अमोल पाठक व महेश मोकाशी, पोलीस उपायुक्त  शिवाजी पवार, पोलीस सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज रामाची दीपावली सर्व घरांमध्ये साजरी होत आहे. यातून लोकांची भक्ती, श्रद्धा आणि आस्था दिसत आहे. जगातील, भारतातील ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावी. या उत्सवाने नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी.''

Web Title: Always give power to those who take others to virtue; Criticism by Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.