शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींच्या टार्गेटबाबत गृहमंत्र्यांवर झालेले आरोप न पटणारे: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं 'कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:43 IST

चुकीचे काम करणाऱ्यांनाच टार्गेट दिले जाते...

ठळक मुद्देशहराला भयमुक्त करणे हेच आमचे टार्गेट

पिंपरी :राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे समोर आले. या 'लेटरबॉम्ब'मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने गेल्या वर्षी अशाच पद्धतीने पत्र दिल्याचे समोर आले होते. कोट्यवधी रुपयांच्या हप्ता वसुलीचा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला होता. मुंबईतही अशाच पद्धतीने लेटरबॉम्ब झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या ‘त्या’ पत्राबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महत्वपूर्ण उत्तर दिले. 

पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि. २२) पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कृष्ण प्रकाश म्हणाले, राज्याचा गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट देईल, हे मनाला पटत नाही. चुकीचे काम करणाऱ्यांनाच टार्गेट दिले जाते. पिंपरी -चिंचवड शहराला भयमुक्त  करणे, हेच आमचे टार्गेट आहे. 

समाजात काही लोक चुकीची कामे करतात. अशाच व्यक्तींना असे टार्गेट दिले जाते. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलीस आयुक्ताच्या परवागीशिवाय असे टार्गेट दिले जाऊ शकत नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे वाटते, असे म्हणून त्यांनी एकप्रकारे देशमुख यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.

 पिंपरी -चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट आहे. पिंपरी -चिंचवड शहरातील अवैध धंद्यांतून वसुलीबाबतचे पत्र व्हायरल झाले. त्याचा तपास ‘सीआयडी’कडे आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही, असेही कृष्णप्रकाश यांनी स्पष्ट केले.

पोलिसांचा संबंध गुन्हेगारांशी, त्यांच्या राजकीय पक्षाशी नाही’

शहरात कोणाचीही दादागिरी पोलीस खपवून घेणार नाहीत. गुन्हेगार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता किंवा समर्थक असला तरी पोलिसांचा त्याच्याशी संबंध नाही. कारण संबंधित गुन्हेगार हा पोलिसांसाठी फक्तच गुन्हेगारच असतो. त्यामुळे गुन्हेगार कोणीही असो, त्याच्या चुकीला माफी नाही, असा इशाराही कृष्ण प्रकाश यांनी दिला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcommissionerआयुक्तPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंग