आळंदी भाजपाचे नगरसेवक संतोष गावडे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:00 IST2019-02-22T01:00:03+5:302019-02-22T01:00:16+5:30
सहा महिन्यांपूर्वी गावडे यांची आळंदी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली होती.

आळंदी भाजपाचे नगरसेवक संतोष गावडे यांचा राजीनामा
आळंदी : येथील नगर परिषदेतील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक संतोष गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पुणे निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या एका जागेवरील सदस्य निवडीसाठी आळंदीत पुन्हा इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.
सहा महिन्यांपूर्वी गावडे यांची आळंदी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली होती. राजीनामा प्रदानप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात जिल्हा भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, एकनाथ मोरे, नगरसेवक संतोष गावडे आदी उपस्थित होते. राजीनाम्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दर सहा महिन्यांनी आळंदीच्या पक्षीय राजकारणात नवा पायंडा पडला आहे. आळंदीत भाजपाची एकहाती सत्ता असून इच्छुकांमध्ये उपशहराध्यक्ष दत्तात्रय काळे, प्रभारी शहराध्यक्ष भागवत आवटे आदींचा समावेश आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय बाळा भेगडे यांच्या पक्षादेशाने सदर राजीनामा देण्यात आल्याचे आळंदी भाजपाचे प्रभारी भागवत आवटे यांनी सांगितले.