शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : सयाजीरावांचे कर्तृत्व गुजरातीमध्येही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:11 AM

बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्र्तृत्वाचा मागोवा घेणा-या खंडांचे प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाप्रमाणे सयाजीरावांची गौरवगाथा गुजराती नागरिकांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी गुजरात शासनाने पुढाकार घेतला आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे  - बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्र्तृत्वाचा मागोवा घेणा-या खंडांचे प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाप्रमाणे सयाजीरावांची गौरवगाथा गुजराती नागरिकांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी गुजरात शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या युगपुरुषाची गौरवगाथा गुजराती भाषेतही शब्दबद्ध होणार आहे.महाराष्ट्र आणि गुजरातचे ॠणानुबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. सयाजीरावांचा शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान याबाबतचा दृष्टिकोन, साहित्य, कला, संस्कृती याविषयीची आस्था, कलांच्या वाढीसाठी, त्यांच्या जतनासाठी बडोदा संस्थानात केलेले प्रयत्न, राज्य प्रशासनातीलहातखंडा ही दोन्ही राज्यांसाठी गौरवाची बाब आहे. ही ओळख सुवर्णाक्षरांमध्ये नोंदवली जावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे २५ खंडांचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी १२ खंडांचे काम पूर्ण झाले असून, त्यापैकी ६ इंग्रजीमध्ये, तर ६ खंड मराठी भाषेमध्ये संपादित करण्यात आले आहेत. शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे हे काम करण्यात येत आहे.पुढील वर्षी या खंडांचा हिंदी भाषेत अनुवाद होणार असल्याची माहिती समितीचे सचिव बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही गौरवगाथा मराठी भाषिकांप्रमाणे गुजराती बांधवांपर्यंत पोहोचावी, यासाठी गुजरात सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.सयाजीराव गायकवाड हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक द्रष्टा आणि लोकशाहीवादी संस्थानिक होते. बडोदा हे त्यांचे संस्थान त्या काळात कला-साहित्यापासून ते आधुनिक बदलांपर्यंत अनेक गोष्टींसाठी वाखाणले गेले होते.उत्तम प्रशासक, द्रष्टा नेता आणि कला, साहित्याची उत्तम जाण असलेले संस्थानिक अशी सयाजीरावांची ओळख आजही कायम आहे.गुजरातचे माजी सांस्कृतिकमंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्याशी गेल्या वर्षी याबाबत चर्चा झाली होती.त्यानंतर सयाजीरावांच्या नातसून आणि महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांची काही शासकीय अधिकाºयांनी भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.सयाजीरावांच्या कार्यकर्तुत्वाचे विविध पैैलू सामान्यांसमोर उलगडता यावेत, यासाठी ही गौैरवगाथा अनुवादित केली जात आहे.पहिल्या १२ खंडांची छपाई बालभारतीतर्फे पूर्ण झाली असून, पुढील खंडांच्या कामालाही वेग आला आहे. सयाजीरावांचा इतिहास शब्दबध्द करत असताना गुजरात शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा मानसही प्रकाशन समितीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सयाजीरावांचे कार्याला नव्याने उजळा मिळणार आहे.राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा सत्कारसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी ‘संमेलनातून मराठी-गुजराती साहित्याच्या आदानप्रदानाला चालना मिळेल. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बडोदा आणि महाराष्ट्र यांचे नाते दृढ करण्याचे काम होईल’, अशा शब्दांत त्यांनी सुतोवाच केले होते.सयाजीराव गायकवाड यांच्या खंडांमध्ये त्यांनी त्या काळात लिहिलेली पत्रे, भाषणे, कायदे, सामाजिक सुधारणा, दुष्काळातील नोंदी, सुप्रशासनाबाबतचे त्यांचे विचार आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे