पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या बारामतीमधून १९९१ मध्ये अजित दादांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. तेव्हापासून त्यांचे पिंपरी-चिंचवडशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. एकत्र काँग्रेस असताना अजितदादांसोबत जवळून काम करता आले, पाच दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता, आपण महापालिकेत एकत्र येऊ आणि एक स्वीकृत सदस्य वाढेल, असे आवाहन त्यांनी केले होते, अशी आठवण खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितली. अजित पवार यांच्या बरोबर खासदार बारणे यांनी काम केले. खासदार बारणे म्हणाले, अजितदादा बहुआयामी व्यक्तीमत्व होते. कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले नेते होते. राज्यातील विकास कामाच्या जडणघडणीत अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. संसदीय राजकारणाची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधून झाली होती. तेव्हा मी कार्यकर्ता होतो. १९९५ मध्ये वीट कामगारांची पतपेढी स्थापन केली त्यावेळी त्यांनी उदघाटन केले. त्यानंतर १९९७ मध्ये मला त्यांनी बोलावून घेतले आणि उमेदवारीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जगदीश शेट्टी आणि विजय लांडे या मित्रांबरोबर दादांशी अनेकदा भेटी गाठी झाल्या होत्या. त्यांच्या बरोबर सासवडपर्यंत अनेकदा प्रवास केला. त्यातून सहवास लाभला. त्यांच्याकडून राजकारणातील अनेक गोष्टी शिकता आल्या.सर्वसामान्य कुटुंबातील अनेक कार्यकर्त्यांना अजितदादांनी घडविले, मोठे केले. स्पष्ट वक्ता, निर्भिड व्यक्तीमत्व, रोखठोक, जे पोटात, तेच ओठावर असे दादांचे व्यक्तीमत्व होते. जगभरात शहराची ओळख करण्यासाठी अजितदादांनी प्रचंड मेहनत घेतली. शहराचा सर्वांगीण विकास अजितदादांनी केला. शहरावर प्रेम करणाऱ्या अजितदादांचे अकाली निधन झाल्याने शहरही पोरके झाले आहे. पाच दिवसापूर्वीच त्यांचा फोन आला होता, श्रीरंग महापालिकेत आपण एकत्र येऊ आणि काम करू. आपण एकत्र आल्याने स्वीकृत सदस्यपदाची एक जागा वाढेल. आमची भेटही होणार होती पण त्यांच्या निधनाचे वृत्त कानी आले.
Web Summary : Srirang Barne remembers Ajit Pawar's dedication to Pimpri-Chinchwad's development. Pawar envisioned collaboration in the municipality and tirelessly worked for the city's progress. His sudden demise leaves a void.
Web Summary : श्रीरंग बारणे ने पिंपरी-चिंचवड के विकास के प्रति अजित पवार के समर्पण को याद किया। पवार ने नगरपालिका में सहयोग की कल्पना की और शहर की प्रगति के लिए अथक प्रयास किया। उनके आकस्मिक निधन से एक खालीपन आ गया है।