शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

'आता आवाज आला ना तर तिकिटच कापतो', म्हणत अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 21:40 IST

शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच आलेल्या डॉ अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजूनही राष्ट्रवादीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चर्चेमुळे मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत

पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी चर्चेत येण्यास सुरुवात झाली असून पक्षात नव्याने दाखल झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध सुरु झाल्याचे चित्र मंगळवारी बघायला मिळाले. यावेळी  विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले बघायला मिळाले. 

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी भोसरीतील ''गावजत्रा मैदान'' येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ही घटना घडली. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच आलेल्या डॉ अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजूनही राष्ट्रवादीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चर्चेमुळे मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांपर्यंत आवाज पोचावा या हेतूनेआणि  लांडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून विलास लांडे पाहिजे, आमचा उमेदवार विलास लांडे अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. 

त्यांना अनेकदा शांत बसवण्याचा प्रयत्न करूनही घोषणाबाजी सुरु होती.अखेर वैतागलेल्या पवार यांचा पारा चढला. ते कार्यकर्त्यांना म्हणाले  की, आता बेंबीच्या देठापासून घोषणा देत आहात मात्र २००९च्या लोकसभा  निवडणुकीत कुठे होतात ? आता घोषणा दिल्यास तिकीटचं  कापतो असं म्हणायलाही ते विसरले नाहीत. 

यावेळी व्यासपीठावर दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, देवदत्त निकम,  शहराध्यक्ष संजोग वाघेरे,  माजी आमदार विलास लांडे,  पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अतुल बेनके, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे उपस्थित होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेbhosariभोसरी