शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर; प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत झालेली भेट चर्चेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:21 IST

पिंपरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचा गट ...

पिंपरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचा गट समर्थकांसह पुन्हा स्वगृही म्हणजे अजित पवार गटात परतणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्यानंतर भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महायुतीत संधी नसल्याने शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत अपयश आले. पराभवानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने गव्हाणे यांना प्रवेशासाठी खासदार श्रीरंग बारणे आणि सुलभा उबाळे यांच्यामार्फत गळ घातली. तेव्हा गव्हाणे यांनी महामंडळाऐवजी विधान परिषद देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासोबतच जावे, असा आग्रह धरला. यादरम्यान अजित पवार गटही सतर्क झाला. गव्हाणे यांचे मन वळविण्यात माजी आमदार विलास लांडे यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, याबाबत गव्हाणे यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती.

आता महापालिका निवडणुकीची सज्जता सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची गव्हाणे यांनी भेट घेतली. त्यामुळे गव्हाणे स्वगृही परततील अशी चर्चा आहे. 

मतदारसंघासह शहरातील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी मतदारसंघासह शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. आमच्या गटाच्या प्रवेशाबाबत विषय निघाला. लवकरच सर्व सहकारी यांच्याशी बोलून चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेऊ. - अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्षविधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय परिस्थिती पाहता भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संधी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मात्र, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचा गट अजित पवार यांच्या संपर्कात आहे. लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी आम्हाला आशा आहे. - फजल शेख, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार