शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

अहमदनगरच्या डाॅक्टरला लुटण्याचा डाव उधळला, सहा जणांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 22:43 IST

तडीपार आरोपीने साथीदारांसह मोठा डाव रचला होता.

पिंपरी : पिस्तुलाचा धाक दाखवून डाॅक्टरला लुटण्याचा कट रचला. याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकून पोलिसांनी एका डाॅक्टरचे प्राण वाचवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांचे विशेष कौतुक केले.   पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय २९, रा. वाकड), आफताब मेहबुब शेख (वय २१ रा. वाकड), रुपेश राजेश गायकवाड (वय २१, रा. चिंचवड), शुभम लक्ष्मण दाते (वय १९, रा. चिंचवड), सचिन बबन जायभाये (वय २४, रा. शेवगाव, अहमदनगर), साहिल हरिदास शिंदे (वय २०, रा. वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक समीर घाडगे यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

तडीपार आरोपी पोलीस पुनीत शेट्टी याने साथीदारांसह मोठा डाव रचला. त्यासाठी त्याला काडतुसे पाहिजे होती. त्यामुळे काडतुसे घेण्यासाठी आरोपी साहिल शिंदे हा गहुंजे येथे येणार आहे, अशी माहिती शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समीर घाडगे यांना मिळाली. त्यानुसार, शिरगाव पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी आलेच नाहीत. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तपासाचे आदेश दिले. गुंडाविरोधी पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. आरोपी साहिल औरंगाबाद महामार्गाने अहमदनगरच्या दिशेने जात असल्याचे समजले. तसेच, आरोपी पुनीत शेट्टी हा धुळे जिल्ह्यात आरोपी जगन सेनानी याच्याकडे पिस्तूल नेण्यासाठी येणार असल्याचे समोर आले. त्यानुसार, धुळे आणि अहमदनगर पोलिसांशी संपर्क करून पिंपरी -चिंचवड पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.   

आरोपींनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच पुनीत शेट्टी याने कट रचल्याचे सांगितले. अहमदनगर येथील पोळ हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर असून त्याच्याकडे उपचारासाठी शहराबाहेरून मोठ्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. आपण त्याला लुटल्यास खूप पैसे मिळतील, अशी माहिती आरोपी सचिन जायभाय याने अन्य आरोपींना दिली. त्यानुसार, आरोपींनी हॉस्पिटल परिसरात रेकी देखील केली. मात्र, पिंपरी -चिंचवड पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.  

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी