शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस सापळा लावून १७० सीसीटीव्ही तपासून चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 14:48 IST

२० गुन्हे उघडकीस : १२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी : शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यानंतर तीन दिवस सापळा रचून सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १० लाखांचे सोने आणि दोन लाख ६० हजारांच्या दुचाकी असा १२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. खंडणी विरोधी पथक आणि चिंचवड पोलिसांच्या सयुंक्त पथकाने ही कामगिरी केली. 

प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय २६, रा. आनंदनगर, चिंचवड), अल्ताफ सलीम शेख (वय १९, रा. हांडेवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी त्यांचे तीन आणि चिंचवडचे एक असे चार पथक तयार केले. सोनसाखळी चोरीच्या घटनांचा चारही पथकांकडून आढावा घेण्यात आला. त्यावेळी १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यावरून आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गांचा आढावा घेऊन तीन दिवस सापळा रचला. दरम्यान पोलीस नाईक आशिष बोटके आणि स्वप्नील शेलार यांना माहिती मिळाली की, आरोपी आकुर्डी, निगडी, चिंचवड, पिंपरी परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलीसांनी आरोपींना चिंचवड येथून ताब्यात घेतले. चिंचवड येथे दूध खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली आरोपींनी दिली. शहरात एकूण १५ ठिकाणी सोनसाखळी हिसकावून चोरी आणि पाच दुचाकी चोरल्याची कबुली आरोपींनी दिली. 

आरोपी प्रभाकर दोडमनी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहर, पुणे रेल्वे, कर्नाटक आदी ठिकाणी जबरी चोरी, वाहन चोरी, असे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस