शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

फेरनिविदेनंतरच साहित्यखरेदी

By admin | Updated: July 8, 2015 02:27 IST

साहित्य खरेदीतील गैैरव्यवहार उघडकीस आणून नगरसदस्यांनी प्रखर विरोध केल्यानंतर मंगळवारी झालेल्या समितीच्या सभेत प्रिंटर, यूपीएस व नोटा मोजण्याचे मशिन बाजारभावापेक्षा

पिंपरी : साहित्य खरेदीतील गैैरव्यवहार उघडकीस आणून नगरसदस्यांनी प्रखर विरोध केल्यानंतर मंगळवारी झालेल्या समितीच्या सभेत प्रिंटर, यूपीएस व नोटा मोजण्याचे मशिन बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी करण्याचे प्रस्ताव दफ्तरी दाखल केले.महापालिकेच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचा प्रशासनाने सपाटा लावला आहे. मात्र, ही खरेदी बाजारभावापेक्षा दुप्पट, तिप्पट दराने करण्याचा घाट घातला आहे, करदात्या नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करून ही खरेदी होत आहे. नोटा मोजण्याचे मशिन, यूपीएस व डिजिटल प्रिंटरची बाजारभावापेक्षा दुप्पट व तिप्पट दराने खरेदीचे प्रस्ताव स्थायीपुढे मंजुरीसाठी ठेवले होते. या तिन्ही साहित्यांच्या खरेदीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या दरपत्रकांचा आधार घेतला नसल्याचे नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी समोर आणले. नोटा मोजण्याचे मशिन बाजारात साडेसात हजार रुपयांना उपलब्ध असताना अशा प्रकारच्या १३ मशिन प्रत्येकी दुप्पट दराने म्हणजे साडेचौदा हजार रुपयांना, डिजिटल प्रिंटर मशिन बाजारात २ लाख ८० हजार रुपयांना उपलब्ध असताना ३ लाख ९१ हजार रुपयांना आणि यूपीएस बाजारात १ लाख १० हजार रुपयांना उपलब्ध असताना ३ लाख २८ हजार रुपयांना खरेदीचा पालिकेने घाट घातला होता. त्याला नगरसेविका सीमा व शेंडगे यांनी विरोध केला. प्रस्ताव मंजूर करू नयेत, अशी मागणी त्यांनी आयुक्त व स्थायी अध्यक्षांकडे केली होती. (प्रतिनिधी)