शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तक्रारीनंतर पिंपरी-चिंचवड सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:17 PM

तक्रारी आल्याने सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची बदली केली आहे. त्यांच्याकडे आता केवळ पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज सोपविले आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक अवैध बांधकामांना प्रशासनाचे पाठबळ असल्याचा राजेंद्र जगताप यांचा आरोपजे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आयुक्तांनी दिला इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अतिक्रमणाला कारणीभूत असल्याच्या तक्रारी आल्याने आणि एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागात ठाण मांडून बसणाऱ्या सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची बदली केली आहे. त्यांच्याकडे आता केवळ पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज सोपविले आहे.नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील भाजपा नेत्यांच्या व्यावसायिक अवैध बांधकामांना प्रशासनाचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहशहर अभियंत्यांना चांगलेच फैलावर घेतले. अयुबखान पठाण यांच्याकडून खुलासा मागविला. अवैध व्यावसायिक बांधकामांना जबाबदार असलेल्या उपअभियंता, बीट निरीक्षकांची नावे मागविली. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. त्यामुळे पठाण आयुक्तांच्या रडारवर आले. दरम्यान, एकाच जागेवर असलेल्या पठाण यांच्याविषयी 'राजकीय आशीवार्दाने एकाच विभागात' असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. निवृत्तीआधी चौकशीचा ससेमिरा नको, अशी विनवणी केल्यावर आयुक्तांनी शिक्षेचे स्वरूप बदलले. त्यानुसार सहशहर अभियंत्यांच्या कामकाजात फेरबदल केले आहेत. 

बांधकाम विभागातच होते ठाण मांडूनबांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभाग महापालिका कामकाजात सर्वांत महत्त्वाचा आहे. या विभागातून बांधकाम परवाना दिला जातो. या विभागातून यापूर्वी केवळ परवाना देण्याचे काम चालायचे. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बांधकाम परवानगी विभागाला अवैध बांधकाम विभागही जोडला. जबाबदारी निश्चित केली. त्यामुळे शहरातील अवैध बांधकामाला हाच विभाग कारणीभूत असल्याचा आक्षेप आहे. महापालिकेत २४ मार्च १९८१ मध्ये अयुबखान पठाण कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. त्यानंतर १९८६ ते ९५ या काळात त्यांनी बांधकाम विभागात उपअभियंता या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची दोन वर्षे दुसºया विभागात बदली झाली. १९९७ ला ते पुन्हा बांधकाम विभागात आले. २००० मध्ये त्यांची बांधकाम विभागातून बदली झाली. त्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून तसेच जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कामकाज पाहिले. २०१३ मध्ये ते पुन्हा बांधकाम विभागात आले. २०१३ पासून आजपर्यंत तेथेच कार्यरत असून त्यांच्याकडे सध्या सहशहर अभियंता पद आहे. तब्बल १६ वर्षे त्यांनी बांधकाम विभागात काम केले आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये ते निवृत्त होणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड