तब्बल २० वर्षांनी भरली मंडई

By Admin | Updated: January 11, 2016 01:12 IST2016-01-11T01:12:33+5:302016-01-11T01:12:33+5:30

मासूळकर कॉलनी येथील (कै.) शंकरराव मासूळकर भाजी मंडईमध्ये शेतकरी आठवडे बाजाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. वीस वर्षांनंतर ही मंडई सुरू करण्यात आली.

After 20 years of full boarding | तब्बल २० वर्षांनी भरली मंडई

तब्बल २० वर्षांनी भरली मंडई

नेहरूनगर : मासूळकर कॉलनी येथील (कै.) शंकरराव मासूळकर भाजी मंडईमध्ये शेतकरी आठवडे बाजाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. वीस वर्षांनंतर ही मंडई सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुरस्कृत नृसिंह शेतकरी स्वयंसहायता समूह यांच्या वतीने मासूळकर कॉलनी येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेंर्गत शेतकरी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या आठवडे बाजाराचे उद्घाटन क्रीडा सभापती समीर मासूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, नगरसेविका सविता साळुंखे, विजय नेरकर, विशाल मासूळकर, शशांक ताटे, रमेश रोंगे, शीतल मासूळकर, जयश्री निमट, शंतनू पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
आठवडेबाजारामध्ये विक्रीसाठी वांगी, कोबू, कांदा,बटाटा,शेवगा, मेथी ,शेपू ,पालक, कोथिंबीर या ताज्या स्वच्छ भाजीपाल्याबरोबर धान्य, कडधान्य, फळे, दुग्धजन्य पदार्थ बाजार ठेवण्यात आला होता. हा आठवडा बाजार दर शुक्रवारी भरवणार असल्याचे क्रीडा सभापती मासूळकर यांनी सांगितले.
ओस पडलेल्या मंडईत गर्दी
महापालिकेने लाखो रुपये खर्चून मासूळकर कॉलनी येथील (कै.) शंकरराव मासूळकर भाजी मंडई बांधली. ही भाजी मंडई गेल्या २० वर्षांपासून बंद आहे; परंतु महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुरस्कृत नृसिंह शेतकरी स्वयंसहायता समूह यांच्या वतीने येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत शेतकरी आठवडेबाजाराचे आयोजन करण्यात आल्यामुळे गेल्या २० वर्षांपासून बंद असलेल्या भाजी मंडई भरली होती. (वार्ताहर)

Web Title: After 20 years of full boarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.