शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पिंपरी पालिकेवर प्रशासक नेमावा: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 21:54 IST

भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा ; सत्ताधा-यांचा नागरिकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा 

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधा-यांनी भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू केली आहे. मूलभूत सोयीसुविधांपोटी सर्वसामान्य नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महापालिकेत धाड टाकल्यानंतर सत्ताधा-यांचा हा प्रताप उघडकीस आला आहे. या कारवाईने सत्ताधा-यांच्या सामुदायिक भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला आहे.

गेल्या साडेचार वर्षात सत्ताधा-यांनी केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही सत्ता त्वरीत बरखास्त करावी. पालिकेतील सर्वच विभागाशी संबंधीत पदाधिका-यांची सखोल चौकशी करावी. जोपर्यंत चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत सत्ता बरखास्त करून महापालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

यासंदर्भात लांडे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात विलास लांडे म्हणाले, ‘‘कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात नागरिकांना जीव वाचवणे मुष्कील झाले होते. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोक-या गेल्या, गोरगरिबांच्या हातचे काम गेले, छोट्या-मोठ्या व्यवसायीक आणि कामगारांच्या घरातील चूल पेटणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत नागरिकांना सोयी सुविधा देण्याचे प्रथम कर्तव्य महापालिकेतील सत्ताधा-यांचे असते. मात्र, नागरिकांना नागरी सुविधांच्यापलीकडे काहीही न देता त्यांच्याकडून कराचे लाखो, करोडो रुपये वेळेत वसूल करून घेतले. नागरिकांनी करातून भरलेल्या करोडो रुपयांवर दरोडा टाकण्याचा सपाटा या सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट पदाधिका-यांनी लावला आहे. याला मुरड घालण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, निवेदने ही दिली. तरीही, या भ्रष्टाचाराला लगाम लागला नाही. अधिका-यांना हाताशी धरून सत्ताधारी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचे आता उघडकीस आले आहे. हे लक्षात आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी महापालिकेत धाड टाकली. या धाडीत सभापतींसह चार कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सत्ताधा-यांच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा फाटला असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.

पालिकेतील भ्रष्ट कारभार थांबविण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांनी अन्य विभागात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे. आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आलेली आहे. त्यामुळे सत्ताधा-यांना भ्रष्ट पैसा जमा करण्याची हाव सुटली आहे. वाट्टेल त्या पध्दतीने निविदा राबविल्या जात आहेत. मजीर्तील व नातेवाईक असलेल्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी रिंग करून निविदा भरली जात आहे. लाखो रुपयांची कामे थेट पध्दतीने दिली जात आहे. यापूर्वी बनावट एफडीआर प्रकरणात देखील पदाधिका-यांचे नातेवाईक असलेल्या ठेकेदारांचा हात आहे. 

......सखोल चौकशीची मागणी करणारकोरोनाच्या नावाखाली तर सत्ताधा-यांनी पालिका अक्षरष: लुटून खाल्ली आहे. अधिकारी, नगरसेवकांच्या भागीदारीत कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. असेच चालू राहिले तर पुढील सहा महिन्यात भ्रष्ट पदाधिकारी पालिकेची तिजोरी रिकामी करतील. त्यामुळे सत्ताधारी पदाधिका-यांच्या संबंधित असलेल्या सर्व विभागांची सखोल चौकशी व्हावी. तोपर्यंत महापालिकेवरील सत्ता बरखास्त करून कामकाज सुरळीत चालवण्यासाठी प्रशासक नेमावा. चौकशीमध्ये दोषी आढळणा-या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांवर कोठोर कारवाई करण्यात यावी,

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण