पिंपरीत डॅशबोर्ड अपडेट न केल्यास खासगी रुग्णालयांवर होणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 08:22 PM2021-03-30T20:22:34+5:302021-03-30T20:23:57+5:30

खासगी रुग्णालयात डॅशबोर्ड अपडेट होत नसल्याच्या तक्रारी...

Action will be taken against private hospitals if the dashboard in Pimpri is not updated | पिंपरीत डॅशबोर्ड अपडेट न केल्यास खासगी रुग्णालयांवर होणार कारवाई 

पिंपरीत डॅशबोर्ड अपडेट न केल्यास खासगी रुग्णालयांवर होणार कारवाई 

Next

पिंपरी चिंचवड : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता कमी पडत असून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. परंतु, खासगी रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. 

खासगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत अशी सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. यासंदर्भात, दररोज बेडची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर न करणा­ऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश पाटील यांनी प्रशासनास दिले आहे. 

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त यांच्या दालनात महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर ‍हिराबाई घुले, नगरसेवक संतोष कांबळे, सतिश कांबळे, आयुक्त राजेश पाटील , अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, डॉ. राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

 बैठकीत डॉ. सतिश कांबळे यांनी कोरोना रुग्णांना भेडसावणा­ऱ्या समस्या, मनपा हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ उपाययोजना व भविष्यात लागणारे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींची त्वरित उपलब्धता व्हावी, जास्तीत जास्त नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, कोविड ॲम्बुलन्स, लागणारे डॉक्टर विषयांवर चर्चा करून माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला कोरोना परिस्थितीवर मात कशी करता येईल, यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Action will be taken against private hospitals if the dashboard in Pimpri is not updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.