शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

बीआरटीतील इतर वाहनांवर कारवाई करावी, प्रशासनाने खासगी वाहनचालकांना दंड ठोठावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:20 AM

किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असून, त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी अपघात होत आहेत.

किवळे : किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असून, त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी अपघात होत आहेत. बीआरटी मार्गाकडून रावेत येथील सर्वांत मोठ्या ‘सेलेस्टियल सिटी सोसायटी’ या गृहप्रकल्पाकडे ये-जा करणे खूपच धोकादायक ठरत असल्याने संबंधितांना निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने रस्ता ओलांडणे असुरक्षित बनल्याने येथील महिलांनी प्राजक्ता रुद्रवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आंदोलन करुन वाहने रोखली होती. तसेच रुद्रवार व स्थानिक नगरसेविका संगीता भोंडवे यांनी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची भेट घेत त्यानंतर मुकाई चौक व सेलेस्टाईल चौक येथे वाहतूक वॉर्डनमार्फत बसव्यतिरिक्त इतर वाहनांना बीआरटी लेनमधून जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. बीआरटीमधून इतर वाहनांना प्रवेश देऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधितांना दंड करावा, अशी मागणी महिलांनी ‘लोकमत’च्या परिसंवादात व्यक्त केली.रावेत येथील सेलेस्टाईल सोसायटी चौक भागात बीआरटीएसच्या दुतर्फा राहणाºया नागरिकांना बीआरटी रस्ता ओलांडणे असुरक्षित बनले होते. गेल्या काही दिवसांत या भागात होणाºया अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. बस व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने, तसेच जनजागृती करण्यात आल्याने अपघात कमी झाले आहेत. - प्राजक्ता रुद्रवारवाहने रोखून आंदोलन करणे हा कायमस्वरूपी तोडगा नाही. मात्र वाहनचालकांत जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.- सुस्वागता रॉय चौधरीबीआरटी मार्गावर रावेत-किवळे भागात विविध ठिकाणी लोखंडी अडथळे, बॅरिकेड्स लावून खासगी वाहने रोखण्यासाठी उपाय योजणे शक्य आहे. तसेच रावेत पुलाजवळ (बास्केट पूल) वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेची आहे. - रश्मी त्यागीआंदोलनादरम्यान बीआरटी लेनमधून पीएमपीशिवाय स्कूल बस, मोटारी ये-जा करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अपघात होत असल्याने महिलांनी आंदोलन करून लेनमधून ये-जा करणाºया वाहनचालकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असून, संबंधित यंत्रणेनेही जबाबदारी स्वीकारून सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा विषय गांभीर्याने हाताळणे गरजेचे आहे. - केतकी नायडूरावेतच्या या भागात सर्वाधिक अपघात होण्यास वाहनांची घुसखोरी जबाबदार असून, खासगी वाहनांवर कारवाई केल्यास भरधाव वेगात लेनमधून जाणारी वाहने जाणार नाहीत. परिणामी सोसायटीच्या भागात राहणाºया नागरिकांना सुरक्षित ये-जा करणे शक्य होईल.- नझला मालाहीरावेत येथील सेलेस्टाईल सिटी सोसायटी चौकात सुरक्षित वाहतुकीसाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. तसेच बीआरटी लेनमधून जाणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यास शिस्त लागू शकते. चौकाजवळ गतिरोधक असावेत जेणेकरून वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.- रिंकू बनाफलबीआरटीमधून नागरिक व वाहनचालक रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. सेलेस्टाईल सिटी भागात ये-जा करण्यासाठी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे महापालिका व पीएमपी यांनी उपाययोजना करून प्रश्न सोडवावा.- मोनल महादेवीमहिलांनी बीआरटी लेनमधून होणारी घुसखोरी रोखण्याचा अनुभव खूप वेगळा होता. वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी कायस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. त्याकरिता नागरिकांनी अधिक सहभाग घेणे गरजेचे आहे. जेणेकरून संबंधित यंत्रणेला निर्णय घेणे भाग पडेल. - रोशनी रॉयकिवळे-सांगवी बीआरटी मार्गावर वाहनचालकांना व नागरिकांना सतत असुरक्षित वाटत असते. वाहतूक नियंत्रक दिवे सुरू ठेवणे आवश्यक आहे. मुकाई चौक ते रावेत दरम्यान गतीने बीआरटी लेनमधून जाणाºया वाहनांचा व बसचा वेग खूप असतो. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. - शांती नेझर

टॅग्स :Puneपुणे