शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

एका वर्षात १४ पोलीस स्टेशनमधून १३२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 18:20 IST

सार्वजनिक सुरक्षेला बाधा

ठळक मुद्दे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी मोहीमआयुक्तालयामुळे गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे कामपोलीस आयुक्तालयामुळे संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्धातही घट

पिंपरी : सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा आणणाºयावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कारवाई केली असून, १४ पोलीस स्टेशनांतून गेल्या वर्षभरात १३२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहेत. आयुक्तालयामुळे गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम होत आहे. पोलीस आयुक्तालयामुळे संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्धही कमी झाली आहेत. औद्योगिकनगरी म्हणून परिचित असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय सुरू होऊन दीड वर्ष होत आले आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयांमुळे कर्मचारी संख्या वाढली आहेत. तसेच गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव दाखल केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोव्हेंबर २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १३२ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत हा तडीपारीचा कालावधी आहे. ९० गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी, ६ गुन्हेगारांना दीड वर्षासाठी, २४ गुन्हेगारांना एक वर्षासाठी, तर १२ गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ - १ मधून ७५, तर परिमंडळ - २ मधून ५७ गुन्हेगारांना तडीपार केले आहे.......

टोळीयुद्धाच्या घटना घटल्याप्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होतो. त्यातच पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हेगार दत्तक घेण्याची योजना सुरू केले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना पोलिसांनी दत्तक घ्यायचे आणि त्यांच्यावर बारीक लक्ष द्यायचे. वेळोवेळी त्याची तपासणी करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात टोळीयुद्धासारख्या घटना घडलेल्या नाहीत, असा पोलिसांचे म्हणणे आहे.पोलीस ठाणी    तडीपार    पिंपरी विभागनिगडी      ०६भोसरी      ०३पिंपरी      १४चिंचवड      ०९एमआयडीसी भोसरी    २०चाकण विभागआळंदी     ०६चाकण     ०९पोलीस ठाणी    तडीपारदिघी     ०८वाकड विभागसांगवी     १२वाकड     १९हिंजवडी    ०८देहूरोड विभागदेहूरोड     १०चिखली    ०२तळेगाव    ०६

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस