शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सेवारस्त्यावर खड्डेच खड्डे!, दुचाकीस्वार घसरून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:44 AM

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.

कामशेत - जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सेवारस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व खडीचे साम्राज्य पसरल्याने महामार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनपेक्षितपणे पुढे आलेल्या खड्डयात वाहने आदळत आहेत. तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तर स्थानिकांना सेवारस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.मागील सतरा ते अठरा महिन्यांपासून सुरू असलेल्या महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मे महिन्यात मुदत संपूनही पन्नास टक्के ही पूर्ण झाले नाही. येथे पवनानगरकडून कामशेतमध्ये येणारे जाणारे नागरिक महामार्ग ओलांडताना अपघातात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. तर अनेकांना अपंगत्व आले. महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी अनेकदा रस्ता रोको व विविध आंदोलने झाली. त्यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. या वेळी स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून दीड महिना उलटला तरी पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने शिवाय सेवारस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी, सेवारस्त्यावर व कडेला झालेला चिखल, गटारीसाठी खोदलेले मोठे खड्डे आदी व इतर अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. एक वेळ महामार्ग ओलांडणे परवडत होते; पण या सेवारस्त्यावरून चालणे जीवघेणे झाले आहे. लहान लहान चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाºया महिला व पालकयांच्यात मोठी भीती निर्माणझाली आहे. त्यामुळेच नको आम्हाला तुमचा उड्डाणपूल आमचा जुना रस्ताच आम्हाला परत द्या, अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत.वाहतूककोंडीची समस्या गंभीर१कामशेतमधील या उड्डाणपुलाच्या कामी नागरिकांची मोठी परवड होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यात सेवारस्त्याच्या कडेला गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. शिवाय मार्गावरून जाणारी अवजड वाहने व इतर वाहनांचा अखंड प्रवास सुरू असून, त्यांनाही येथून प्रवास करणे जिकरीचे जाले आहे. यातूनच महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दोन्ही लेनवर आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.उड्डाणपुलाच्या कामात दिरंगाई२ अनेक माहीतगार वाहनचालक कामशेतमधील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करत असल्याने शहरातील वाहतुकीवर परिणाम होत आहे. या उड्डाणपुलाचे काम आणखी किती वर्षे सुरू राहणार आहे. स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळेच येत्याकाही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामामध्येझालेली दिरंगाई, नागरिकांची गैरसोय तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राजकीय पक्ष आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या