शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Accident: पिंपरीत आजोबांसोबत दुचाकीवरून निघालेल्या नातवाचा अपघाती मृत्यू; दुसरा नातू गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:08 IST

दोन नातवांना घेऊन जात असलेल्या आजोबांच्या दुचाकीला हायवा गाडीने धडक दिली

पिंपरी : दोन नातवांना घेऊन जात असलेल्या आजोबांच्या दुचाकीला हायवा गाडीने धडक दिली. यात एका नातवाचा मृत्यू झाला तर दुसरा नातू गंभीर जखमी झाला. पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर, पिंपरी येथे रविवारी (दि. २४) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

इजान, असे मृत्यू झालेल्या नातवाचे नाव आहे. तर सैफ हा गंभीर जखमी झाला. इकबाल अब्दुल कादर शेख (वय ५५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हायवा गाडीचालक इंद्रजीत कुमार साकेत (वय २६, रा. विनोदेवस्ती, भूमकर चौक, हिंजवडी, मूळ रा. पामारीया, ता. सिंहावल सिंधी, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दोन नातवांना घेऊन मोठी मुलगी आसमा हिच्याकडे फुगेवाडी येथे दुचाकीवरून जात होते. ते जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना वल्लभनगर येथील पेट्रोल पंपाजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या हायवा गाडीने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे दोन्ही नातू खाली पडले. त्यात इजान याचा मृत्यू झाला. तर सैफ हा गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर