वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात ; पाच जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:40 PM2020-02-20T12:40:28+5:302020-02-20T12:45:14+5:30

चिंचवड गावातून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबामाळ चौकालागत आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.या अपघाता नंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

Accident in Akurdi due to lostcontrol of vehicle; Five people were injured | वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात ; पाच जण जखमी 

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात ; पाच जण जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देदैव बलवत्तर म्हणून बचावले ;पाच जण जखमी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात

चिंचवड: अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यावर अचानक टेम्पो चाकलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुकानात घुसला.या घटनेत एका दुचाकीस्वारासह पाच जण जखमी झाले.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.चिंचवड गावातून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबामाळ चौकालागत आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.या अपघाता नंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या या भागात अचानक घडलेल्या या घटनेमुळे येथील वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


चिंचवड कडून आकुर्डीकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो राडत्यावर जाणाऱ्या दुचाकी स्वराला धडकत बाजूला असणाऱ्या दुकानात घुसला .दुकानाबाहेर उभ्या असणारे चार जण या घटनेत जखमी झाले.या घटनेत दुचाकीचे व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.अपघाताच्या या घटने नंतर जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या भागात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.वाहतूक नियंत्रण करण्यासाठी घटनास्थळी पोलीस उपलब्ध झाले नाहीत.बराच वेळ ही वाहने काढण्यासाठी कार्यवाही केली गेली नाही. या भागात मुख्य रस्त्यावर अनधिकृत उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडत असतात.वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडत असल्याचे परिसरातील नागरीक संतप्त व्यक्त करीत आहेत.अत्यंत वर्दळीच्या या भागात असणारे अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

दैव बलवत्तर म्हणून बचावले
टेम्पो चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटल्यानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दगडावर आदळला.पुढे असणाऱ्या दुचाकी स्वराला धडकत टेम्पो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानात घुसला.या दुकाना बाहेर चहा पित असणारे पाच जण तत्परतेने पाळाल्याने किरकोळ जखमी झाले.दैव बलवत्तर असल्याने हे या अपघातातून बचवल्याची भावना प्रत्यक्ष दर्शींनी व्यक्त केली.

Web Title: Accident in Akurdi due to lostcontrol of vehicle; Five people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.