शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शंभरहून अधिक CCTV पाहून अपहृत बालकाचा २३ तासांत शोध; बाळ आईच्या कुशीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 18:42 IST

हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले

- नारायण बडगुजर

पिंपरी : सिग्नलवर वस्तू विक्री करणाऱ्या दाम्पत्याच्या बालकाचे एका महिलेने अपहरण केले. पोलिसांनी २३ तासांमध्ये शोध घेऊन मुलाला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली. रवी सुनील पवार व राधा पवार हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साहित्य विक्री करीत होते. मंगळवारी (दि. २७) नेहमीप्रमाणे तीन मुलांना सोबत घेऊन पवार दाम्पत्य वस्तू विक्री करीत होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास रवी पवार हे चौकातील झाडांच्या कुंड्यांलगत मुलांना बसवून वडापाव आणण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची पत्नी सिग्नलवर वस्तू विक्री करीत होती. दहा मिनिटांमध्ये रवी पवार परत आले असता त्यांना त्यांचा मुलगा राहुल तिथे नसल्याचे लक्षात आले. पवार दाम्पत्याने परिसरात शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवताडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदविला. पिंपरी पोलीस, अनैतिक मानवी  वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा युनिट - २ यांची स्वतंत्र पथकांनी तपास सुरू केला.

तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले. आरोपी महिलेचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. आरोपी महिलेने मुलाला शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात सोडून दिल्याचे बुधवारी रात्री समजले. पिंपरी पोलिसांचे पथक शिरगाव येथे गेले. अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेऊन फिर्यादीकडे खात्री करून दिले. आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.

सहायक आयुक्‍त प्रेरणा कट्टे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गुन्हे शाखा युनिट दोन तसेच शिरगाव पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड