लोणावळा : सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याकरिता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने गणपती उत्सवाचे औचित्य साधत गुरुवारी सायंकाळी सर्व धर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात यानिमित्त सत्यनारायण महापुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु धर्माचे संजय जाधव, मुस्लिम धर्माचे हुसेनबाबा शेख, शिख धर्माचे सिख्खा सिंग, खिश्चन धर्माचे फादर अनिल नगरकर, जैन धर्माचे ललित सिसोदिया, रजपुत धर्माचे भुपतसिंग यांच्यासह विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता कमिटी व महिला दक्षता समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, वडगावचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रनावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही आरती करण्यात आली. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले व उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी सांगितले.
लोणावळ्यात सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वधर्मीय आरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:42 IST
सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले.
लोणावळ्यात सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वधर्मीय आरती
ठळक मुद्देलोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात यानिमित्त सत्यनारायण महापुजा व महाप्रसादाचे आयोजन