भावासोबतच्या भांडणानंतर दहा वर्षीय मुलाची आत्महत्या

By नारायण बडगुजर | Updated: January 9, 2024 22:39 IST2024-01-09T22:38:04+5:302024-01-09T22:39:39+5:30

सार्थक संतोष सोनाने (१०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

A ten-year-old boy commits suicide after a fight with his brother | भावासोबतच्या भांडणानंतर दहा वर्षीय मुलाची आत्महत्या

भावासोबतच्या भांडणानंतर दहा वर्षीय मुलाची आत्महत्या

पिंपरी : खेळताना लहान भावासोबत झालेल्या भांडणानंतर दहा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमध्ये सोमवारी (दि. ८) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

सार्थक संतोष सोनाने (१०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक याचे आई–वडील दोघेही कामावर गेले होते. त्यावेळी घरी सार्थक आणि त्याचा लहान भाऊ खेळत होता. खेळताना त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर सार्थक याने घराच्या छताला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.

सार्थक याच्या लहान भावाने ही बाब शेजारी राहत असलेल्यांना सांगितली. शेजाऱ्यांनी सार्थक याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Web Title: A ten-year-old boy commits suicide after a fight with his brother