शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी ऐतिहासिक बाब;विनय कुमार चौबे ठरले कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले पोलिस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:42 IST

आयुक्तालयातील अडचणी, समस्या समजून घेऊन त्याबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करीत असतानाच चारही आयुक्तांच्या बदल्या झाल्या.

नारायण बडगुजरपिंपरी : शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. आयुक्तालयाची घडी बसवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण अपेक्षित होते. त्यानुसार विनय कुमार चौबे यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून, पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी ही ऐतिहासिक बाब आहे. या दोन वर्षांच्या कालावधीत आयुक्त चौबे यांनी जागा, मनुष्यबळ, वाहने उपलब्ध करून घेत आयुक्तालयाची घडी बसवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.उद्योगनगरी, कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस दलाची विभागणी करून स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. सुरवातीच्या काही वर्षांत पुरेसे मनुष्यबळ, वाहने, जागा, इमारत यासह नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती, विविध पथके आदींची उपलब्धता होऊन पोलिस आयुक्तालयातील कामकाजाची घडी बसविणे आवश्यक होते.त्यासाठी तत्कालीन संबंधित पोलिस आयुक्तांनी पूर्णपणे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची मूदतपूर्व बदली झाली. आयुक्तालयातील अडचणी, समस्या समजून घेऊन त्याबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करीत असतानाच चारही आयुक्तांच्या बदल्या झाल्या. मात्र अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी असलेले विनय कुमार चौबे हे दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त ठरले आहेत.मनुष्यबळ, साधनसामुग्री, नवीन पोलिस ठाणेपोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले त्यावेळी केवळ तीन पोलिस उपायुक्त पदे मंजूर होती. पोलिस आयुक्त चौबे यांनी अपर आयुक्त एक आणि उपायुक्तांची दोन तर सहायक आयुक्तांची चार पदे मंजूर करून घेतली. संत तुकाराम नगर, दापोडी, काळेवाडी, बावधन या चार पोलिस ठाण्यांची निर्मिती केली. त्यासाठी ३९० पदे मंजूर करून घेतली. अंमली पदार्थ शोध व गुन्हे शोध श्वान पथक मंजूर करून १० पदे मंजूर करून घेतली. यासह नवीन १०१ जीप, १० बस, एक ट्रक, एक टॅंकर, तीन टेम्पो ट्रॅव्हलर व २९ दुचाकी मिळवल्या.आयुक्तालय, मुख्यालय, पोलिस ठाण्यांसाठी जागापोलिस आयुक्त चौबे यांनी आयुक्तालयासाठी चिखली येथे ३.३९ हेक्टर जागा मिळवली. तेथे आयुक्तालय उभारण्यासाठी १८०.६२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी व परिमंडळ दोन उपायुक्तांच्या कार्यालयासाठी वाकड येथील कस्पटे वस्तीत पीएमआरडीएकडून १५ एकर जागा तसेच शासनाकडून २४९ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यासह पोलिस मुख्यालयासाठी ताथवडे येथे ५० एकर जागा, चिखली पोलिस ठाणे, परिमंडळ तीन उपायुक्त कार्यालयासाठी जागा, यासह सहायक आयुक्त व पोलिस ठाणे, चौक्यांसाठीही जागा मिळवल्या. देहूरोड येथे बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसाठी विश्रामगृह मंजूर केले.आयुक्तालयाची पुनर्रचनापोलिस आयुक्त चौबे यांनी आयुक्तालयाची पुनर्रचना केली. यात परिमंडळ तीनची निर्मिती करून नवीन विभाग कार्यान्वित केला. नवीन सायबर पोलिस ठाणे मंजूर करून घेतले. बाॅम्ब शोधक व नाशक पथकाची निर्मिती केली. पोलिस आयुक्तालय स्तरावर सोशल मीडिया लॅब कार्यान्वित केली. पोलिसांसाठी रुग्णालय सुरू केले.गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यापोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारांना दणका दिला. यात मोकांतर्गत ९८ टोळ्यांमधील ५९२ संशयितांना अटक केली. ३९४ अग्निशस्त्रे व १६०३ धारदार शस्त्रे जप्त केली. ५२७ संशयितांना तडीपार करून ४६ संशयितांवर स्थानबद्धतेची कारवाई केली.पोलिस आयुक्त - नेमणूक - कालावधीआर. के. पद्मनाभन - १५ ऑगस्ट २०१८ - १० महिने २७ दिवससंदीप बिष्णोई - ११ जुलै २०१९ - १४ महिने २२ दिवसकृष्ण प्रकाश - २ सप्टेंबर २०२० - १८ महिने १७ दिवसअंकुश शिंदे - १८ एप्रिल २०२२ - ७ महिने २६ दिवसविनय कुमार चौबे - १३ डिसेंबर २०२२ 

नागरिकांशी संवादावर भर दिला. व्हिजिबल पोलिसिंग, दिशा उपक्रम, यासह पोलिसांसाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे नागरिकांनी तसेच आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांच्यात संवाद घडण्यास मदत झाली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. यातूनच पोलिस आयुक्तालयाची घडी बसण्यास मदत होत आहे. - विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय