शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 18:38 IST

ईडीची कारवाई सुरू असताना केले पुरावे नष्ट

पिंपरी : दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानी याच्या घरावर सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या पथकाने शुक्रवारी (दि. २७) छापा मारला. यावेळी सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, अमर मूलचंदानी यास उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अन्य पाच जणांना रविवारी (दि. २९) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

अमर मूलचंदानी, अशोक साधुराम मूलचंदानी, मनोहर साधुराम मूलचंदानी, दया अशोक मूलचंदानी, साधना मूलचंदानी, सागर मनोहर मूलचंदानी, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि सेवा विकास को ऑप बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात पिंपरी-चिंचवड शहरात अनेक गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेकडून दि सेवा विकास को ऑप बँकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते.  

सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी साडेसहाला अमर मूलचंदानी याच्या घरावर छापा मारला. बराच वेळ दरवाजा ठोठावून देखील दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडण्यास सुरवात केली. त्यानंतर दरवाजा उघडला. ईडीचे अधिकारी घरात आल्यानंतर बराच वेळ अमर मूलचंदानी एका खोलीत लपून होता. मात्र, त्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने तो दरवाजा तोडण्याची तयारी केली. त्यानंतर चावीने हा दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर ‘इडी’च्या पथकाने अमर मूलचंदानीला ताब्यात घेतले. दरम्यान, अमर मूलचंदानी याने मोबाइलमधील पुरावे नष्ट केले, असे फिर्यादीत नमूद आहे. ईडीने ताब्यात घेताच काही वेळाने अमर मूलचंदानी याने छातीत दुखत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. 

''अमर मूलचंदानी हा रुग्णालयात आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह सहा जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. महिलांना रविवारी (दि. २९) ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता महिलांसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  - रुपाली बोबडे, पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी'' 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीbankबँकPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल