दुचाकीच्या डिकीतील ८० हजार पळविले; अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या वाहनतळावरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:10 IST2017-12-02T15:05:50+5:302017-12-02T15:10:34+5:30
भोसरीत दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या रोकडसह ८२ हजार ५०० रुपयांच्या वस्तू डिकीचे कुलूप उचकटून चोरट्याने पळवून नेल्या. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीच्या डिकीतील ८० हजार पळविले; अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या वाहनतळावरील प्रकार
पिंपरी : दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या रोकडसह ८२ हजार ५०० रुपयांच्या वस्तू डिकीचे कुलूप उचकटून चोरट्याने पळवून नेल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान भोसरीच्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या वाहनतळावर घडली. अज्ञात चोरट्याविरूद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नितीन दिनकर जाधव (वय ३६, रा. कळस अपार्टमेंट, कळस, आळंदी रस्ता) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी जाधव हे शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी दुचाकी नाट्यगृहाच्या वाहनतळावर उभी केली होती. या दुचाकीच्या डिकीचे कुलूप उचकटून चोरट्याने डिकीत ठेवलेली साडेसात हजारांची रोकड ७५ हजार रुपए किंमतीचे २ तोळे ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बँकेचे एटीएम कार्ड असा एकूण ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज पळवून नेला. नाट्यगृहाच्या वाहनतळावर दुचाकी उभी करणे असुरक्षित असल्याचे या घटनेमुळे निदर्शनास आले आहे.