पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते किवळे पीएमपी बस उलटून ८ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:20 IST2018-02-26T15:20:49+5:302018-02-26T15:20:49+5:30
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते किवळे पीएमपी बस उलटून ८ प्रवासी जखमी
देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपी बस (एमएच १२ सीएच ३९८६) निगडीहून किवळे येथे जात असताना मुख्य रस्त्यावर अचानक पलटी झाली. अपघातात बसचा चालक रामदास बांदल (वय ५५) व वाहक श्याम पाटील (वय ५०) यांना उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमधील आणखी सहा प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.