नवनगर प्राधिकरणाच्या २३ भूखंडांसाठी ७१९ निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 03:15 AM2018-03-18T03:15:09+5:302018-03-18T03:15:09+5:30

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निवासी भूखंडाचा लिलाव केला जाणार आहे. या भूखंडांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, ३८ भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील २३ भूखंडांसाठी तब्बल ७१९ इच्छुकांनी लिलावात भाग घेत निविदा सादर केल्या.

 71 tenderers for 23 plots of the Town Authority | नवनगर प्राधिकरणाच्या २३ भूखंडांसाठी ७१९ निविदा

नवनगर प्राधिकरणाच्या २३ भूखंडांसाठी ७१९ निविदा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निवासी भूखंडाचा लिलाव केला जाणार आहे. या भूखंडांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, ३८ भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील २३ भूखंडांसाठी तब्बल ७१९ इच्छुकांनी लिलावात भाग घेत निविदा सादर केल्या.
निवासी भूखंड लिलावासाठी प्राधिकरणाकडे सध्या दोनशे हेक्टर जागा विकासासाठी उपलब्ध आहे. त्यातील काही अविकसित निवासी भूखंड प्राधिकरणाने लिलावाद्वारे ९९ वर्षांच्या भाडेकराराने देण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे दीड वर्षाने प्राधिकरणाने लिलाव आयोजित केले आहेत. यासाठी काही भूखंड मागास घटकांसाठी राखीव आहेत.
पहिल्या टप्प्यात लिलावात पेठ १, ४, १८, १९, २५ मधील २३ भूखंडांचा आणि दुसऱ्या टप्प्यात पेठ क्रमांक १,२, ४, १८ आणि २७ अ मधील भूखंडांचा लिलाव होणार आहे. प्लॉट क्रमांक ६८६ साठी सर्वाधिक ७२ इच्छुकांनी आणि प्रभाग एक मधील ३६८ क्रमांकाच्या भूखंडाला अवघ्या दोन जणांनी लिलाव अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्याचा लिलाव २१ मार्चला जाहीर होईल.

नागरिकांना घराची संधी
प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून सामान्य घटकातील नागरिकालाही पिंपरी-चिंचवड शहरात आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची संधी मिळणार आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी हे भूखंड आहेत. त्यामुळे नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसºया टप्प्यातील लिलावात एका प्लॉटला तीनपेक्षा कमी निविदा आल्यास मुदत वाढविली जाणार आहे, असे प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

या माध्यमातून भूखंड घेऊन घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आता दुसºया टप्प्यातील प्रक्रिया सुरू आहे.
- सतीशकुमार खडके,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
नवनगर विकास प्राधिकरण

Web Title:  71 tenderers for 23 plots of the Town Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.