लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील ७१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By नारायण बडगुजर | Updated: February 29, 2024 12:05 IST2024-02-29T12:04:42+5:302024-02-29T12:05:19+5:30
पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या अधीक्षकपदी बदली झाली...

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील ७१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस दलात बदल्या केल्या जात आहेत. यात पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा ७१ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या अधीक्षकपदी बदली झाली. तसेच पुणे लोहमार्गच्या अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झाली. पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सोलापूर शहर आणि सहायक पोलिस आयुक्त डाॅ. विवेक मुगळीकर यांची श्रीवर्धनचे उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली झाली. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांनी बुधवारी (दि. २८) याबाबतचे आदेश दिले.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, कृष्णदेव खराडे, अमरनाथ वाघमोडे, शंकर अवताडे, अशोक कदम, राम राजमाने, वसंतराव बाबर, श्रीराम पोळ, राजेंद्र निकाळजे, बडेसाब नाईकवाडे, रमेश पाटील यांची ठाणे शहर येथे बदली झाली. तसेच पोलिस निरीक्षक संजय तुंगार यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे बदली झाली. पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली.
ठाणे येथील पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात, निवृत्ती कोल्हटकर, अंकुश बांगर, अशोक कडलग, नितीन गीते, विजय वाघमारे, संजय गायकवाड, संदीप सावंत, सुहास आव्हाड तसेच नाशिक येथील निरीक्षक प्रमोद वाघ हे पिंपरी-चिंचवड शहर दलात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सहायक पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, विशाल जाधव, अभय दाभाडे, सारंग चव्हाण, सागर काटे, समीर वाघ, स्पृहा चिपळूणकर, तौफिक सय्यद, स्वप्नाली पलांडे, योगेश गायकवाड, राकेश गुमाणे, मंगल जोगन यांची बदली झाली. तसेच नाशिक शहरचे सहायक निरीक्षक राकेश भामरे हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात आले.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर, विजय जगदाळे, नयना कामथे, संगीता गोडे, प्रदीप गायकवाड, रोहन गायकवाड, विद्या माने, सागर बामणे, महेंद्र गाढवे, अमोल ढेरे, सचिन चव्हाण, रुपेश साबळे, रोहित दिवटे, मिनीनाथ वरुडे, गोविंद चव्हाण, विवेक कुमटकर, विकास मडके, रवींद्र भवारी, नीलेश चव्हाण, काळू गवारी, गणेश गायकवाड, उत्तम ओमासे, संदीप जाधव, गोविंद पवार, यशवंत साळुंखे, विनोद शेंडकर, नवनाथ कुदळे, अशोक तरंगे, श्रीकांत साकोरे, प्रशांत थिटे, प्राजक्ता धापटे, संजय ढमाळ, कोंडीभाऊ वालकोळी, जीवन मस्के, संग्राम मालकर, नागेश येळे, वर्षा कादबाने, संजय बारवकर, हिरामण किरवे, कृष्णहरी सपकाळ, संतोष येडे, श्रीकृष्ण दरेकर, रमेश पवार यांची बदली झाली. अश्विनी उबाळे, प्रकाश कातकाडे, नाईद शेख, वैशाली गुळवे, अश्विनी तळे, अजय राठोड यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली आहे.