शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

कोरोनाकाळात नियम उल्लंघनप्रकरणी तब्बल ५९,८०० खटले; राज्य सरकारचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 17:47 IST

लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती.

पिंपरी : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल करण्यात आले. अशाप्रकारे ५९,८०० खटले दाखल करून गुन्हेही दाखल झाले. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. जमावबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे तसेच भादंवि कलम १८८ अन्वये खटला दाखल करून दंड आकारणी करण्यात येत होती. यातील बहुतांश नागरिकांनी दंडाची रक्कम भरली. मात्र बहुतांश जणांनी दंड भरलेला नाही. हे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याने या दंड न भरलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.शहरात मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू करून संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. नंतरच्या टप्प्यात या कारवाईचे अधिकार पोलिसांकडे देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनीही मोठी कारवाई करून दंडाची आकारणी केली.

अवैध धंद्यांवर कारवाईलॉकडाऊनकाळात शहरात मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरू होते. गावठी दारुच्या भट्ट्या, मटका, जुगार अड्डे, अंमलीपदार्थांची तस्करी, दारुची अवैध विक्री असे प्रकार सुरूच होते. या अवैध धंद्यांसाठी काही लोक एकत्र येऊन गर्दी करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे वेळोवेळी समोर आले. त्यावरून पोलिसांनी अशा अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली. जमावबंदी, आपत्ती व्यवस्थापन व भादंवि कलम १८८ अन्वये ही कारवाई झाली. यातील काही प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच अशा काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोनाकाळातील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने निर्णय घेतला असल्याचे समजले. मात्र त्याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. कोणते गुन्हे मागे घ्यायचे किंवा काय कसे करावे, हे संबंधित आदेश प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होऊ शकेल. त्यानुसार पुढील कारवाई व कार्यवाही करण्यात येईल.- सुधीर हिरमेठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार