शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पाणी आरक्षणासाठी ४५ कोटी; महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:28 AM

आंद्रा व भामा आसखेड योजनेतून मिळणार शहराला पाणी

पिंपरी : महापालिकेला आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीच्या आरक्षणास मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी सुमारे २३९ कोटी रुपयांचा सिंचन पुनर्स्थापना खर्च राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे. ही रक्कम पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने समान हप्त्यांत भरण्याची सवलत आहे. पहिल्या वर्षी ४५ कोटी रुपये देण्यात येणार असून, याबाबतच्या तरतूद वर्गीकरण प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.महापौर राहुल जाधव अध्यक्षस्थानी होते. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात शहरातील नागरिकांच्या पाण्याची तहान भागविणे अशक्य आहे. त्यामुळे आंद्रा धरणातून ३६.८७ दलघमी आणि भामा आसखेड धरणातील ६०.७९ दलघमी पाणी आरक्षित ठेवले होते. मात्र, पाण्याचे आरक्षण मंजूर झाल्यापासून तीन वर्षांत महापालिकेने करारनामा करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच सिंचन पुनर्स्थापनेची २३८.५३ कोटी रुपयांची रक्कम भरण्याबाबतही अनास्था दाखवली. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाने २७ जुलै २०१७ रोजी आरक्षण रद्द केले होते. महापालिका प्रशासनाने पाणी आरक्षणाचा सुधारित फेरप्रस्तावराज्य सरकारला पाठविला. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीसमोर ठेवला. मंत्री समितीने या आरक्षण प्रस्तावांना नुकतीच मुदतवाढ दिली. हे पाणी घेण्यासाठी महापालिकेला सरकारकडे सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी सुमारे २३९ कोटी रुपये जमा करणे बंधनकारक आहे. ही रक्कम आता २०१८-१९ पासून पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने समान हप्त्यात भरण्याची सवलत दिली आहे. पहिला हप्ता भरल्यानंतर जलसंपदा विभागाशी करारनामा करण्यात येणार आहे.उपसूचना : हद्दीबाहेर पुरविणार पाणीमहापालिकेमार्फत हद्दीबाहेरील सिद्धिविनायकनगरी, श्रीविहार नगरी, श्रीनगरी, समर्थनगरी, दत्तनगरी, आशीर्वाद कॉलनी या भागात दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यांपैकी सिद्धिविनायक नगरी, श्रीविहार नगरीतील नळजोडधारकांकडून निवासी दराने पाणीपट्टी आकारणी केली जाते. या धोरणानुसार समर्थनगरी, दत्तनगरी, आशीर्वाद कॉलनीतील नळजोडधारकांना निवासी दराने पाणीपट्टी आकारावी, अशी उपसूचनाही मंजूर केली.आयत्यावेळी मंजुरीराज्य सरकारच्या निर्णयानंतर आयत्या वेळी ४५ कोटी रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव सभागृहनेते एकनाथ पवार यांनी मांडला. नगररचना भूसंपादन निधी (१४ कोटी), आरोग्य मुख्यालय (२० कोटी) आणि अखर्चित निधी (११ कोटी) या लेखाशीषार्तून ४५ कोटी रुपये पाणीपुरवठा विशेष योजना निधी कामावर वर्ग करण्यास मान्यता द्यावी, असे उपसूचनेत नमूद आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwater shortageपाणीटंचाई