धक्कादायक ! भुताची भीती दाखवत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:08 AM2018-10-03T09:08:36+5:302018-10-03T11:42:29+5:30

पिंपरीमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

4 Year Old girl Raped in Pimpari chinchwad | धक्कादायक ! भुताची भीती दाखवत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

धक्कादायक ! भुताची भीती दाखवत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

पिंपरी चिंचवड -  पिंपरीमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागसेन परिसरातील ही  घटना आहे. चिमुकलीला भुताची भीती दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका तडीपार गुंडास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.   या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरात लैंगिग अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर परिसरात खेळत असणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला भुताची भीती दाखवत तिला निर्जनस्थळी नेऊन नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अंगणात खेळणाऱ्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे कुटुंबीय धावपळ करत होते. काही वेळानंतर मुलगी स्वतःहून घरी आली. तिच्या अंगावरील जखमा पाहून पालकांनी तिला याबाबत विचारपूस केली असता,तिने 'भागूचा काका' असे म्हणत घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर तिला तातडीनं उपचारांसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी ससून येथे हलवण्यात आले.
मुलीने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी एका तडीपार गुंडास ताब्यात घेतले असून चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

(सीरियल रेपिस्ट : कुरेशीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढताच)

पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपरीमध्येच चॉकलेटचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला होता. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हिंजवडी परिसरातील ही धक्कादायक आणि संतापजनक घटना होती.  याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. कासारसाई येथील दोन मुली रविवारी मंदिर परिसरात खेळायला गेल्या होत्या. यावेळेस आरोपी गणेश निकम आणि त्याच्या साथीदाराने या दोघींना पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. यानंतर दोघांनी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत मंदिरामागील जंगलात नेले आणि बलात्कार केला. घडल्या प्रकाराबाबत कोणाला काहीही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी मुलींना दिला होती.  

त्यामुळे भीतीपोटी दोघींनी कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. 18 सप्टेंबरला यातील एका मुलीची प्रकृती खालावल्यानं पालकांनी तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. ही गंभीर आणि हादरवणारी बाब समजल्यानंतर तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. मुलगी बेशुद्धावस्थेत असल्यानं पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळवण्यास अडचण निर्माण होत होती. अखेर दुसऱ्या मुलीने धाडस करुन कुटुंबीयांना सर्व काही सांगितले व पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.

Web Title: 4 Year Old girl Raped in Pimpari chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.