शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मावळ मतदारसंघात ३७९० दिव्यांग मतदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 14:23 IST

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगातर्फे दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्धमावळ लोकसभा मतदारसंघातील १४१ मतदान केंद्र संवेदनशील 

पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगातर्फे दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात ३७९० दिव्यांग मतदार आहेत. यात उरण विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त ८६१ तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ३७९ दिव्यांग मतदार आहेत.दिव्यांग मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून निवडणूक आयोगाने कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यासाठी दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिव्यांग मतदार असलेल्या मतदान केंद्र तळमजल्यावर हलविण्यात आले आहेत. जे केंद्र तळमजल्यावर नाहीत अशा ठिकाणी दिव्यांगांसाठी डोलीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 विधानसभा मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची संख्यापनवेल - ७१९कर्जत - ७५८उरण - ८६१मावळ - ५७९ चिंचवड - ३७९पिंपरी - ४९४एकूण - ३७९०

१४१ मतदान केंद्र संवेदनशील मावळ लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील केंद्रांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. एकूण १४१ संवेदनशील केंद्र आहेत. यात विधानसभा मतदारसंघनिहाय पनवेलमध्ये ३, कर्जतमध्ये २, उरणमध्ये ११, मावळमध्ये २०, चिंचवडमध्ये ४१ आणि पिंपरीमध्ये ६४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान