शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या ३७ मिळकती जप्त, मिळकतकर वसुली पथकाची कारवाई; नागरिकांनी घेतला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:23 IST

शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपये पेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १०९ जणांना नोटिसा दिल्या असून आजपर्यंत ३७ मिळकती जप्त केल्या आहेत. जप्तीची कारवाई सुरू झाल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे.

पिंपरी - शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपये पेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १०९ जणांना नोटिसा दिल्या असून आजपर्यंत ३७ मिळकती जप्त केल्या आहेत. जप्तीची कारवाई सुरू झाल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजल्याने अनधिकृत बांधकामांना शास्ती लावण्यात आली होती. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण मंजूर केले असले तरी जाचक अटीमुळे फक्त नऊ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान मार्च एंडिंगमुळे मिळकतकर विभागाने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पूर्वीच्या नोटिसा बजाविल्यानंतरही सात दिवसांचे आत मिळकतकराची रक्कम भरणा केलेली नाही, अशा मिळकतधारकांवर मिळकत जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुटीचे दिवशी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. मिळकतधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. तसेच मिळकतकराचा आॅनलाइन भरणा करणाºया मिळकतधारकांना सामान्य करात दोन टक्के सवलत आहे. आजअखेर दोन लाख ७८ हजार मिळकतधारकांनी ३८० कोटी ४३ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख १८ मिळकतधारकांनी आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे. पाच हजारांपेक्षा अधिक बिल असणारांची संख्या एक लाख तेरा हजार तीनशे बहात्तर आहे. त्यापैकी व्यावसायिक थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. एकूण ३७ मिळकतींपैकी थेरगावातील १४, आकुर्डीतील सात, तळवडेतील सहा, भोसरीतील तीन, सांगवीतील दोन, मनपा भवन परिसरातील एक अशा मिळकतींना सील ठोकलेआहे. तसेच पुढील आठवड्यात पंचवीस मिळकतींवर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.पाच हजारांपेक्षा अधिक जणांवर होणार कारवाई?पिंपरी-चिंचवड कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी २०१८ अखेर ज्या मिळकतधारकांकडे रक्कम रुपये पाच हजार पेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा एक लाख १३ हजार ३७२ मिळकतधारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत. जे मिळकतधारक नोटीस बजावूनही थकबाकी भरणार नाहीत, अशा मोठ्या थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सहआयुक्त गावडे यांनी दिली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTaxकर