शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदी लागू झाल्यापासून ३६३ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:48 IST

गल्लीबोळातील टोळके, हुल्लडबाजांवरही केली जातेय कारवाई

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते पिंपरी-चिंचवड शहरात

पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात 16 मार्चपासून जमावबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली. तसेच केंद्र सरकारने देखील देशभरात लॉक डाउन केले आहे. याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरात 10 दिवसांत 363 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरात 20 मार्च रोजी कोरोनाचा बारावा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात होते. त्यामुळे महापालिका व पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी 16 मार्च रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदी लागू केली. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी देखील जनता कफ्यूर्नंतर लगेचच संचारबंदी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ही संचारबंदी पुढे कायम ठेवली आहे. या कालावधीत जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे काही प्रकार समोर आले. 

जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेची दुकाने, आस्थापने वगळून इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काही व्यावसायिकांकडून दुकाने सुरू असल्याचे समोर येत आहेत. तसेच काही नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरताना दिसून येत आहेत. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अशा व्यावसायिक व नागरिकांवर पोलिंसाकडून कारवाई करण्यात येत आहे. 

भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये ही कारवाई केली आहे. त्या अंतर्गत 16 ते 25 मार्च दरम्यान 363 गुन्हे दाखल झाले आहेत. यात बुधवारी (दि. 25) विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 73 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच काही वाहनचालकांना दंडुक्यांचा चोप देण्यात आला तर काहींना पोलिसांनी रस्त्यावरच उठाबशा काढण्यास सांगितले.

गल्लीबोळांतील टोळक्यांना पांगवलेशहरातील मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांची ये-जा या रस्त्यांवर दिसून येते. मात्र शहरातील काही भागांतील गल्लीबोळात काही नागरिक एकत्र येत आहेत. टोळक्याने गप्पांची मैफल रंगविली जात आहे. त्यामुळे जमावबंदी व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन त्यांच्याकडून होत आहे. अशा टोळक्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. अशा टोळक्यांवर व गल्लीबोळात हुल्लडबाजी करणा-यांवर देखील कारवाई करून पोलिंसाकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलीस ठाणेनिहाय बुधवारी दाखल गुन्हे : भोसरी -   4चिंचवड - 7चिखली  - 3हिंजवडी - 12आळंदी-    4चाकण -   3वाकड  - 6एमआयडीसी भोसरी -  9निगडी - 8पिंपरी  -  4सांगवी  -  4दिघी  - 2देहूरोड - 7एकूण -73

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस