शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

बिले रोखल्याने वाचवले तीनशे कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 04:02 IST

सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत.

पिंपरी : सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत. यामुळे महापालिकेचे ३०० कोटी रुपये वाचले आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभा-यांची पाठ थोपटली.भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले. या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनोगतामध्ये शहराच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. सीमा सावळे यांनी आभार केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.स्मार्ट, पारदर्शक कारभार कराई- इनॉग्रेशन’ या पद्धतीने विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने केल्यास अधिक लोकांशी बोलता येते. खर्चही वाचतो. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये क्षमता आहे. स्मार्ट, पारदर्शक कारभार करा. महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.महापौरांचे लग्न अन् हशाअविवाहित महापौर नितीन काळजे यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. मेट्रोही लवकर येत आहे. मात्र, अजूनही महापौर अविवाहीत कसे ? मी अविवाहित असतानाच नागपूरचा महापौर झालो. तेव्हा मलाही याचा त्रास झाला. त्यामुळे महापौरांच्या लग्नाविषयी उत्सुकता आहे. आम्हाला लग्नाला बोलवा अथवा न बोलवा; परंतु आता लग्नाचा विषय अजेंड्यावर घ्या.’’ यावर नाट्यगृहात एकच हशा पिकला.पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्त्वत: मान्यता दिली आहे. वाढती लोकसंख्या पाहता, आयुक्तालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्थ विभागाकडे हा प्रस्ताव गेला आहे; त्यामुळे लवकरच आयुक्तालय सुरू होईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री