शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी पुनर्वसनास २८० कोटींचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 14:17 IST

मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एचएला मदत करा, असे साकडे घातले होते...

ठळक मुद्दे: पीपीपी तत्त्वावर कंपनी सुरू ठेवण्याबाबत निर्णय २०१४ पासून केंद्राने आजपर्यंत सुमारे दीडशे कोटींचा निधी वेतनासाठी दिला

पिंपरी : औद्योगिकनगरीची पायाभरणी करणाऱ्या पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीस जीवदान देण्यासाठी २८० कोटींचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. तसेच पीपीपी तत्त्वावर कंपनी सुरू ठेवण्याबाबत मॉडेल तयार करण्याचाही निर्णय झाला आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीची पायाभरणी पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीत हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीची (एचए) सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारचा अंगीकृत हा प्रकल्प असून, पेनिसिलीनची निर्मिती या कंपनीत केली जात होती. पुढे १९९६ मध्ये कंपनीस आजारी उद्योग म्हणून घोषित केले होते. त्यानंतर २००६ मध्ये केंद्र सरकारच्या वतीने विशेष आर्थिक मदत म्हणून २६० कोटींची मदत केली होती. त्यानंतर हा प्रकल्प अडचणीत आला. त्यानंतर २०१४ पासून आजपर्यंत सुमारे दीडशे कोटी वेतनासाठी केंद्राने निधी दिला होता. एचए कंपनीचे पुनर्वसन करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्राला साकडे घातले होते. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर बारणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एचएला मदत करा, असे साकडे घातले होते. कामगार संघटनेनेही नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आर्थिक नियोजनाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, राज्यमंत्री मनसुख मांडविया आदी उपस्थित होते. बैठकीविषयी माहिती देताना बारणे म्हणाले, एच़ ए़ प्रश्नाबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. त्या वेळी २८० कोटींचे पॅकेज देण्याचे सरकारने कबुल केले आहे. त्यापैकी १५८ कोटी वेतनासाठी तर १७२ कोटी व्हीआरएस योजनेसाठी देण्यात येणार आहे. तसेच हा प्रकल्प सरकार पातळीवर सुरू ठेवणे अवघड असल्याने पीपीपी तत्त्वावर सुरू ठेवावा, असा विचार पुढे आला. तसेच या संदर्भात कोणते धोरण ठरवायचे, पीपीपीचे मॉडेल तयार करावे, याबाबत मंत्र्यांनी सूचना केल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCentral Governmentकेंद्र सरकार