शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत सोलापूर-पुणे-मुंबई ‘वंदे भारत’मधून २३ लाख जणांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:53 IST

- घाट माथ्यावरही सुसाट धाव; पुणे-मुंबई मार्गावर साडेतेरा लाख प्रवासी 

पुणे :पुणे-सोलापूर रेल्वे विभागातून सुरू झालेल्या सोलापूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने तीन वर्षांत २३ लाखांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी साेलापूर- मुंबईदरम्यान वंदे भारत सुरू झाली होती. जानेवारी २०२६ अखेरपर्यंत या गाडीची सरासरी १०२.२७ टक्के ऑक्युपन्सी नोंदली गेली असून, तब्बल २३ लाख ४३ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, पुणे आणि मुंबईदरम्यान आर्थिक, सामाजिक तसेच धार्मिक पर्यटनाला चालना दिली आहे. वेगवान प्रवास, अत्याधुनिक सुविधा आणि वेळेची बचत यामुळे ही सेवा नियमित प्रवाशांसाठी वरदान ठरली आहे. आधुनिक ‘पुश-अँड-पूल’ तंत्रज्ञानामुळे भोर घाटासारख्या अवघड घाट विभागातून बँकर लोकोशिवाय ही गाडी धावते. दरम्यान पुणे-मुंबई-पुणे या मार्गावर तीन वर्षांत सुमारे साडेतेरा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. सकाळच्या वेळी अतिरिक्त जलद सेवा उपलब्ध झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी जाणारे आणि सायंकाळी परतणारे प्रवासी या गाडीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

------

वेळेची बचत, २० डब्यांचा रेक : सोलापूर-पुणे-मुंबई असा सुमारे ४५५ किलोमीटरचा प्रवास ही गाडी अवघ्या ६ तास ३० मिनिटांत पूर्ण करते. सुपरफास्ट गाड्यांच्या तुलनेत सुमारे दीड तासांची बचत होत आहे. कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर हे या गाडीचे प्रमुख थांबे असून, आठवड्यातून सहा दिवस गाडी धावते. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२५ मध्ये १६ डब्यांच्या रेकऐवजी २० डब्यांचा रेक जोडण्यात आला. त्यामुळे आसनक्षमता १,४४० पर्यंत वाढली असून, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

------

तीन वर्षांची कामगिरी

- एकूण प्रवासी संख्या : २३ लाख ४३ हजार

- सरासरी ऑक्युपन्सी : १०२.२७ टक्के

- प्रवासाचे अंतर : ४५५ किमी

- एकूण वेळ : ६ तास ३० मिनिटे

- आसनक्षमता : १,४४० (२० डबे)

------

मार्गनिहाय प्रवासी संख्या :

- पुणे ते मुंबई -- ६ लाख ७४ हजार

- मुंबई ते पुणे -- ६ लाख ७३ हजार

- सोलापूर ते पुणे - २ लाख २० हजार

- पुणे ते सोलापूर - १ लाख ७० हजार

 ---

‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायी झाला आहे. या गाडीला पुण्यातून कायम गर्दी असते. आगामी काळातही या गाडीला मागणी वाढण्याची शक्यता आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे 

English
हिंदी सारांश
Web Title : 2.3 Million Passengers Travel Solapur-Pune-Mumbai on Vande Bharat in Three Years

Web Summary : Over 2.3 million passengers traveled via the Solapur-Pune-Mumbai Vande Bharat Express in three years. The train boosts tourism and offers faster, convenient travel, maintaining high occupancy. Increased capacity with 20 coaches addresses rising demand, benefiting commuters.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVande Mataramवंदे मातरमPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र