शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

स्मार्ट सिटीसाठी दोनशे कोटी, सनियंत्रण समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 3:05 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे़ परंतु याबाबतचा निधी महापालिकेला अजूनही मिळालेला नाही. यावर महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. महिनाअखेरपर्यंत सुमारे दोनशे कोटींचा निधी मिळणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत सांगितले, अशी माहिती महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे़ परंतु याबाबतचा निधी महापालिकेला अजूनही मिळालेला नाही. यावर महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. महिनाअखेरपर्यंत सुमारे दोनशे कोटींचा निधी मिळणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत सांगितले, अशी माहिती महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.महापालिका निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. शहराचा तिसºया टप्प्यात समावेश झाला. डीपीआर करणे, स्मार्ट सिटी कंपनीची बैठक होण्यास विलंब झाला. स्मार्ट सिटीत समावेश होऊनही वर्षभराचा कालखंड पूर्ण होण्यास आला असतानाही केंद्राकडून निधी आलेला नाही. याबाबत महापालिका भवनात झालेल्या स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीस महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते.एकनाथ पवार म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांना गती देण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन केली आहे. तिची बैठक प्रत्येक महिन्याला घेण्यात येते. त्यात आढावा घेण्यात येतो. स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी जागा, निविदा काढणे, प्रकल्पांचे मनुष्यबळ याविषयांवर चर्चा झाली. स्मार्ट सिटीसाठी प्राधिकरणातील पीसीएनटीडीएच्या कार्यालयाचा विचार सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल.शिवसेना, मनसे बाहेरमहापालिका भवनातील स्मार्ट सिटीच्या बैठकीची माहिती शिवसेनेचे प्रमोद कुटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांना देण्यात आली नव्हती. दोन्ही पक्षाच्या सदस्यांना निमंत्रण नसल्याने ते महापालिका भवनात असतानाही बैठकीस उपस्थित नव्हते. याबाबत चिखले यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन नाराजी व्यक्त केली.संचालकांची लवकरच बैठकप्रकल्पांच्या अनुषंगाने मनुष्यबळाच्या विषयांवरही चर्चा झाली. सुरुवातीला काही निविदा काढणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले. त्यात स्मार्ट सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी पार्किंग व्यवस्था, पॅनसिटीतील आवश्यक कामे, वायफाय यंत्रणा आदी कामे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले. कामे थांबू नयेत यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे, असे प्रशासनाच्या बैठकीत सांगण्यात आले. पुढील महिन्यात संचालक मंडळाची बैठक होणार आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या