उद्योजकाकडून १४ लाखांची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 04:06 IST2016-01-15T04:06:57+5:302016-01-15T04:06:57+5:30
वीज मीटरमध्ये फेरफार करून मोई फाटा, चिखली येथील सनशाइन पॉलिमर्स या कारखान्यात १४ लाख ३५ हजार ७१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी

उद्योजकाकडून १४ लाखांची वीजचोरी
पिंपरी : वीज मीटरमध्ये फेरफार करून मोई फाटा, चिखली येथील सनशाइन पॉलिमर्स या कारखान्यात १४ लाख ३५ हजार ७१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कारखान्याचे मालक हेशम अख्तर खान यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भोसरी विभागांतर्गत चिखलीतील मोई फाटा येथे हेशम खान यांच्या मालकीचा सनशाइन पॉलिमर्स हा कारखाना आहे. तेथे महावितरणची औद्योगिक वीजजोडणी आहे. कारखान्यातील वीजवापराच्या बिलाच्या विश्लेषणातून वीजवापराच्या नोंदीबाबत शंका निर्माण झाल्याने महावितरणकडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. कारखान्यात १ लाख ९ हजार ६९९ युनिटची म्हणजे १४ लाख ३५ हजार ७१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी कारखान्याचे मालक खान यांच्यावर महावितरणच्या रास्ता पेठ ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, वीजमीटरमध्ये तांत्रिक बदल करून आणि रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचे प्रकार यापूर्वी अनेक कारखान्यांतून उघडकीस आले आहेत. उद्योगाबरोबरच घरगुती आणि व्यापारी मीटरमधून वीजचोरीचे प्रकार समोर येत आहेत.(प्रतिनिधी)