शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक परिसरातील ११ पाकीटमार पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:36 IST

निर्जनस्थळी रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरटे ब्लेड कटर,चाकू, कात्री, मिरची पूड यांचा वापर करून नागरिकांची लुटमार करत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी येत होत्या.

ठळक मुद्देपोलीस, स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी राबवली धडक मोहीम 

रावेत : महिनाभरापासून आकुर्डी रेल्वे स्थानक व आजूबाजूच्या परिसरात पाकीटमारी करणाऱ्या ११ पाकिटमारांना पकडून आकुडीर्तील पोलीस तसेच पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते यांनी रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले. रेल्वे प्रवाशांचे खिसे कापणारे पाकिटमारांचे हे टोळके याच परिसरात वावरत होते. आकुर्डी हे त्यांचे आश्रयस्थान बनले होते. कासारवाडी, पिंपरी,भाटनगर,ताडीवाला रस्ता, चिंचवड विद्यानगर,घोरावाडी,लोणावळा,तळेगाव येथून येणारे काही चोरटे रेल्वे प्रवाशांची लुटमार करीत होते.निर्जनस्थळी रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरटे ब्लेड कटर,चाकू, कात्री, मिरची पूड यांचा वापर करून नागरिकांची लुटमार करत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे नागरिक तसेच स्टेशन स्थानकाचे कर्मचारीसुद्धा हैराण झाले होते. कटर गँगचे लालिबाई,प्रियाबाई तसेच टकल्या आणि ढाकण्या हे चोरटे नेतृत्व करत आहेत. निझाम मोहम्मद शेख,अजय लक्ष्मण राठोड,अनिल सिसरन, राजू शेंडगे,विशाल संजय वाघमारे,दिपक अशोक महाडिक, समाधान पटेल, तेजस वाघमारे, मुकेश चव्हाण,दिनेश यादव, अशोक सोनवणे अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक,पोलीस मित्रांनी आॅपरेशन कटर गँंग ही धडक मोहीम राबवली. ११ गुंडपाकीटमारांना शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या मोहिमेत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील,अर्चना घाळी, विद्या शिंदे, बाबासाहेब घाळी,अमृत महाजनी,अमोल कानु,अमित डांगे,संतोष चव्हाण,विशाल शेवाळे, देवजी सापारिया,जयेंद्र मकवाना,जयप्रकाश शिंदे,नितीन मांडवे, कपिल पवार यांनी सहभाग घेतला. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी संजय पाचपुते,आकुर्डी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर राजेश कुमार,पॉइंट्समन दत्ता खाडे, खडकी रेल्वे आर. पी. एफ. विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. लाड, आर.पी.एफ. आणि जी.आर.पी.एफ. चे सहायक पोलिस उपनिरीक्षक तात्या करदाळे,भाऊ साळवे यांनीही सुरक्षा कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. 

टॅग्स :ravetरावेतrailwayरेल्वेPoliceपोलिसCrimeगुन्हाArrestअटक