लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी स्कूलच्या दहावीचा पहिल्या तुकडीचा निकाल १०० टक्के लागला आहे. कल्पेश अहिरे याने ९७.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. इंग्रजीमध्ये ९५ व विज्ञान विषयात ९८ गुण मिळाले. गार्गी थोरात हिने गणित व समाजशास्त्र या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवीत एकूण ९७.२० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला. प्रज्ञा पांडे हिने ९५.८० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन इंद्रमनसिंग, नवलसिंग, सचिव तरुण सिंग, राजेंद्रसिंग, नरेंद्रसिंग, मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘प्रियदर्शनी’चा १००% निकाल
By admin | Updated: June 10, 2017 02:07 IST