शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑक्टोबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' डेस्टिनेशन्स आहेत हटके!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 3:51 PM

1 / 7
ऑक्टोबर महिना आला की सगळीकडे सण उत्सवांचं वातावरण असतं. अशावेळी शाळा-कॉलेज आणि बऱ्याचदा ऑफिसलादेखील सुट्ट्या असतात. अशावेळी आपल्या घरच्यांसोबत काही वेळ घालवण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी हटके डेस्टिनेशन सर्च करत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. जाणून घेऊया अशा काही ट्रॅव्हल डेस्टिनेशबाबत जेथे जाऊन तुम्हाला थोड्या चेंज सोबतच वेगळ्या वातावरणात वेळ घालवता येईल...
2 / 7
पश्चिम बंगालमधील सर्वात सुंदर बीच म्हणून दीघा बीचची ओळख आहे. तुम्हाला बीचवर जाऊन तुमची सुट्टी एन्जाय करायची असेल तर हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी बेस्ट असेल.
3 / 7
'क्वीन ऑफ हिल्स'च्या नावाने ओळखलं जाणारं दार्जिलिंग अनेकांच ड्रीम हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं. येथील नॅशनल पार्क, टॉय ट्रेन, रॉक गार्डन आश्चर्यचकीत करणारं आहे.
4 / 7
यूनेस्कोच्या 32 भारतीय हेरिटेज जागांपैकी हम्पी हे सुंदर मंदिरं आणि आर्किटेक्चरच्या आश्चर्यांसाठी ओळखलं जातं.
5 / 7
मेहरानगड फोर्टसाठी प्रसिद्ध असलेलं जोधपूर 'ब्लू सिटी'च्या नावाने ओळखलं जातं. कारण येथील सर्व घरं निळ्या रंगाने रंगवण्यात आली आहेत.
6 / 7
पांढरं वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेले कच्छ गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध प्रेक्षणीयस्थळ आहे. याव्यतिरिक्त येथील महाल आणि चवदार खाद्यपदार्थ पर्यटकांना भूरळ घालतात.
7 / 7
भारताच्या सर्वात अद्भुत हिल्स स्टेशन्सपैकी एक म्हणजे नैनीताल होय. अनेक नव्या जोडप्यांचं हनिमून डेस्टिनेशन म्हणून नैनीताल ओळखलं जातं.
टॅग्स :tourismपर्यटन