शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्ली एअरपोर्टवर प्रवासी विसरलेयत अशा वस्तू ज्या पाहुन तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 5:47 PM

1 / 12
दिल्ली विमानतळावर असंख्य प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तूंची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक सामान्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह बेल्ट, लॅपटॉप, फोन, काही रोख रक्कम या स्वरूपात लोकांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तू विसरलेल्या आहेत.
2 / 12
प्रवासात वस्तू हरवल्यास त्यामुळे मनस्ताप तर होतोच. शिवाय, एखादी महत्त्वाची वस्तू राहून गेल्यास त्यामुळं काही महत्त्वाची कामंही अडून बसू शकतात. यासाठी आपल्या वस्तू सांभाळून काही वेळा त्रास होऊ शकतो.
3 / 12
दिल्ली विमानतळानं आता या समस्येवर तोडगा काढला आहे. त्यांच्या वेबसाइट तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर तुमच्या हरवलेल्या वस्तूंचा शोध घेता येतो.
4 / 12
प्रवासाला निघताना मोजक्या आणि आवश्यक वस्तूच केवळ सोबत ठेवल्या पाहिजेत. भरपूर सामान सोबत घेतल्यामुळं वस्तू विसरण्याच्या किंवा हरवण्याच्या घटना घडतात. कधी हे सामान सापडतं तर कधी नाही.
5 / 12
दिल्ली विमानतळानं उपलब्ध केलेल्या या सुविधेचा वापर करून तुम्ही तुमच्या इथं विसरलेल्या वस्तू परत मिळवू शकता.
6 / 12
ही सुविधा सुरू झाल्यापासून काही लोकांनी सोशल मीडियावर ही 'विसराळू लोकांची गंमत पाहण्याची संधी' असल्याचं म्हटलं आहे. विविध ठिकाणचे विसराळू कोणकोणत्या वस्तू विसरू शकतात, हे इतर लोकांना विमानतळाच्या वेबसाईटवरून समजणार आहे.
7 / 12
यामुळं गंमत म्हणून ही यादी वाचण्याचा आनंदही लोक घेऊ शकतील. याचा आता ट्विटर थ्रेड बनला आहे आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
8 / 12
एखाद्या विशिष्ट तारखेला विसराळू लोकांनी काय विसरलंय हे समजू शकतं. यावरून @MumbaiCentral या ट्विटर वापरकर्त्याने याबद्दल एक ट्विट केलं आहे. काहींनी या यादीचा फोटोही शेअर केला आहे.
9 / 12
एखाद्या विशिष्ट तारखेला विसराळू लोकांनी काय विसरलंय हे समजू शकतं. यावरून @MumbaiCentral या ट्विटर वापरकर्त्याने याबद्दल एक ट्विट केलं आहे. काहींनी या यादीचा फोटोही शेअर केला आहे.
10 / 12
विमानतळाच्या अधिकृत वेबसाइटवर आम्हाला आढळलेल्या गोष्टींची यादी येथे आहे, ज्या प्रवाशांनी राजधानी दिल्लीतच्या विमानतळावर विसरल्या आहेत. यामध्ये आंब्याच्या पेटीपासून ते मिक्सर ग्राइंडर, टॉर्च आणि बांगड्यांचाही समावेश आहे.
11 / 12
वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या इतर अनेक सामान्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह असंख्य प्रवाशांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तू जसे की बेल्ट, लॅपटॉप, फोन, काही रोख रक्कम देखील मागे ठेवल्या आहेत.
12 / 12
काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये स्वतः विसरलेल्या वस्तूंबद्दलचे अनुभवही सांगितले आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, 'मी माझी हरवलेली वस्तू यादीत आहे. परंतु, ती 'वेअरहाऊस'मध्ये 5 दिवसांहून अधिक काळ असल्यानं, काही महिन्यांत तिचा लिलाव होणार आहे.'
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके