kolkata city of joy 5 dreamy places see the photos
सिटी ऑफ जॉय कोलकातामधील 'ही' ठिकाणे, आयुष्यात एकदा भेट द्यायलाच हवी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 08:25 PM2023-06-03T20:25:46+5:302023-06-03T20:30:27+5:30Join usJoin usNext पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता देखील सिटी ऑफ जॉय या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता देखील सिटी ऑफ जॉय या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. येथील लोक फिरण्याच्याबाबतीत आघाडीवर आहेत. पण तुम्ही आयुष्यात एकदा तरी कोलकात्याला भेट दिलीच पाहिजे. दक्षिणेश्वर काली मंदिर: पश्चिम बंगालमधील हुगळी नदीच्या काठावर वसलेले दक्षिणेश्वर काली मंदिर हे येथील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. देवीच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणांहून लोक येथे येतात. रवींद्र सरोवर: रवींद्र सरोवर हे कोलकात्याच्या खास ठिकाणांपैकी एक आहे. सकाळी या सुंदर सरोवरजवळ फिरणे सर्वात चांगले आहे. स्थानिक लोकही येथे फिरताना दिसतील. प्रिंसेप घाट: जेम्स प्रिंसेप घाटाला प्रिंसेप घाट असेही म्हणतात. दरम्यान, प्रिंसेप घाट इथल्या लोकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. कोलकाताला भेट देताना प्रिंसेप घाटाला भेट द्यायला विसरू नका. हावडा ब्रिज : हावडा ब्रिज ही केवळ कोलकात्याचीच नाही तर संपूर्ण पश्चिम बंगालची ओळख आहे. हावडा ब्रिज कोलकात्यात 1942 साली बांधून पूर्ण झाला. हे कोलकातामधील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक मानले जाते.टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips