शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' ठिकाणी करू शकता New Year Celebration, येईल खूप मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 1:05 PM

1 / 5
नवी दिल्ली : नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे. काहींनी तर नवीन वर्षात संकल्प केले असतील. दरम्यान, नवीन वर्षाचे सेलिब्रेशन (New Year Celebration) करण्यासाठी भारतात अशी अनेक ठिकाणं आहे, जी इतर देशांपेक्षा खूप चांगली आहेत. जर तुम्हीही अशी ठिकाणं शोधत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही ठिकाणांची माहिती देत आहोत.
2 / 5
केरळ हे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. केरळला गॉड्स ऑन कंट्री म्हणजेच देवाचे स्वतःचे घर म्हटले जाते. केरळमधील वायनाडमध्ये तुम्ही हे वर्ष साजरे करण्यासाठी जाऊ शकता. येथे तुम्हाला धबधबे, मसाल्यांची लागवड, बागा आणि अनेक रिसॉर्ट्स मिळतील.
3 / 5
जर तुम्ही राजस्थानमधील तलावांचे शहर उदयपूरला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला राजेशाही जीवनशैली जवळून पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही येथे जाऊ शकता.
4 / 5
भारतात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोलकातामध्ये खूप चांगले केले जाते. कोलकात्यात पारंपारिक पद्धतीने साजरे होणारे नवीन वर्ष जगभरात प्रसिद्ध आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.
5 / 5
जर तुम्हाला एखाद्या खास ठिकाणी नवीन वर्ष साजरे करायचे असेल तर माउंट अबू हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही नवीन वर्षात जाऊ शकता. हे ठिकाण राजस्थानच्या इतर ठिकाणांपेक्षा थंड आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनNew Yearनववर्ष