शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Eknath Shinde: रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 4:44 PM

1 / 9
राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली.
2 / 9
विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे.
3 / 9
अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण होती. आपण बंड केला नसून उठाव केल्याचं सांगत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच आपला जीवनप्रवासही उलगडला.
4 / 9
एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आता, रिक्षाचालकांसाठी त्यांच्याकडे आमदार उदय सामंत यांनी मोठी मागणी केली आहे.
5 / 9
एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सोशल मीडियामुळे सर्वत्र चर्चा झाली. अनेकांनी शिदेंच्या भाषणाचं कौतुक करत त्यांना दाद दिली. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर रिक्षावाला म्हणत टीका केली होती.
6 / 9
आता ठाण्यातील रिक्षाचालक एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री या आशयाचे टि शर्ट परिधान करुन रिक्षावाल्यांनी एकनाथ शिदेंचं समर्थन केलं आहे.
7 / 9
ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली.
8 / 9
मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले टीशर्ट रिक्षाचालकांनी घातले होते. तसेच रिक्षाचे चिन्ह व रिक्षावर लालबत्ती दाखवण्यात आलेली आहे.
9 / 9
दरम्यान, 'काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेauto rickshawऑटो रिक्षाShiv Senaशिवसेना