शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सानियाची बहिणही होणार क्रिकेपटूची पत्नी, पाहा मेहंदी सोहळ्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 3:20 PM

1 / 8
सानिया आणि शोएब हे दाम्पत्य नेहमी चर्चेत राहिले आहे. आता सानियाची बहीण अनम मिर्झा क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार आहे.
2 / 8
भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि अनम यांच्यात प्रेमसंबंध आहेत.
3 / 8
हैदरबाद येथील एका हॉटेलमध्ये सानिया मिर्झाच्या बहीणीचा मेहंदी सोहळा पार पडला.
4 / 8
असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. लवकरच अनम आणि असद लग्न करणार आहेत.
5 / 8
लग्नापूर्वी सानिया आणि अनम मैत्रीणींसह नुकतेच पॅरीसमधून बॅचलर पार्टी करून परत आले.
6 / 8
पहिला पती अकबर रशीदकडून काडीमोड घेण्यासाठी अनमने गतवर्षी कोर्टात केस दाखल केली आहे.
7 / 8
18 नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा आणि हैदराबादचा उद्योगपती अकबर यांचा विवाह झाला होता.
8 / 8
आता अनम पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सानियानं बहीणीच्या मेंहदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिक