शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतापाठोपाठ Sania Mirzaची पाकिस्तानलाही मदत; गरजूंसाठी केलं मोठं दान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:14 AM

1 / 11
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी एका फाऊंडेशनच्या सहकार्यांनं हैदराबाद येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे.
2 / 11
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
3 / 11
अशा गरजू व्यक्तिंसाठी टेनिसपटू सानिया मिर्झानं एक चळवळ उभी केली होती. त्यातून तिनं एका आठवड्यात 1.25 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. या निधीतून जवळपास 1 लाख लोकांना मदत करता येणार आहे.
4 / 11
सानियाला नुकतंच फेड कप हार्ट पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
5 / 11
या पुरस्कारासह मिळालेली बक्षीस रक्कमही सानियानं हैदराबाद सरकारला दान केली.
6 / 11
सानियानं आता पाकिस्तानातील गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊनमुळे तेथेही अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी सानियानं दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 / 11
अल जझीराच्या वृत्तानुसार सानियाच नव्हेत तर राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि मारिया शारापोव्हा यांनीही Stars Against Hunger या चळवळीत त्यांची स्वाक्षरी असलेल्या काही वस्तू लिलाव करण्यासाठी दिल्या आहेत.
8 / 11
राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांच्याप्रमाणे सानियानंही या चळवळीसाठी तिची स्वाक्षरी असलेल्या वस्तू लिलावासाठी दान केल्या आहेत.
9 / 11
पाकिस्तानचा टेनिसपटू एैसाम-उल-हक कुरेशी यानं ही चळवळ सुरू केली आहे. या चळवळीतून उभा राहणाऱ्या निधीतून पाकिस्तानमधील गरीब कुटुंबांना रेशन पुरवण्यात येणार आहे.
10 / 11
कुरेशीनं या चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल फेडरर आणि मिर्झा यांचे आभार मानले आहे. कुरेशी म्हणाला,''खेळाडू म्हणून देशासाठी काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करत आहे.''
11 / 11
या मोहिमेत शोएब मलिक, वसीम अक्रम यांनीही हातभार लावला आहे.
टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSania Mirzaसानिया मिर्झाRoger fedrerरॉजर फेडररNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचShoaib Malikशोएब मलिक