YouTube व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी पहाव्या लागणार 1-2 नव्हे तर इतक्या अॅड्स, युजर्समध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 02:49 PM2022-09-14T14:49:24+5:302022-09-14T14:53:22+5:30

आधीच 1-2 अॅड्समुळे त्रस्त असलेल्या युजर्सना YouTube आणखी मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.

आधीच 1-2 अॅड्समुळे त्रस्त असलेल्या युजर्सना YouTube आणखी मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.

सुरुवातीला YouTube वर एखादी अॅड यायची आणि त्यातही अॅड स्किप करण्याचा पर्याय दिला जायचा. पण, आता बहुतेक जाहिरातांनी स्किपचा पर्याय दिला जात नाही. यावरुन युजर्सनी सोशल मीडियावर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. यातच एका रिपोर्टमधून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे युजर्स आणखी नाराजी होण्याची शक्यता आहे.

एक रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, आता YouTube वर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी युजर्सना एक-दोन नव्हे, तर 5 अनस्किपेबल अॅड्स पाहाव्या लागणार आहेत. म्हणजे, या पाच जाहिराती स्किपही करता येणार नाहीत. यावर कंपनीमध्ये टेस्टिंग सुरू आहे. आधीच एक किंवा दोन जाहिरातीमुळे त्रस्त झालेल्या युजर्सना आता 5 अॅड्स पाहाव्या लागणार आहेत. यावरुन नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ज्या युजर्सना कंपनीच्या पायलट टेस्टदरम्यान पाच-पाच जाहिराती पाहाव्या लागल्या आहेत, अशा युजर्सनी Twitter आणि Reddit वरुन आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, हे फीचर नॉन-प्रीमियम युजर्ससाठी आहे. प्रीमियम युजर्सना अॅड-फ्री एक्सपीरिएंस मिळेल. सुरुवातीला हे पाच अॅड्सही स्किप केले जाऊ शकत होते, पण आता याचे स्किप बटन काढण्यात आले आहे.

याबाबत एका युजरने ट्विट केले, ज्यावर कंपनीने रिप्लाय दिला. कंपनीने रिप्लाय देताना म्हटले की, 'या नवीन अॅड फॉर्मेटला बंपर अॅड्स म्हटले जाते. या अॅड्स फक्त 6 सेकेंदाच्या असणार आहेत. तुम्ही या अॅड्सबाबत आपले मत मांडू शकता, यासाठी आमच्या अॅड सेक्सनमध्ये जाऊन फीडबॅक नोंदवा.' समोर आलेल्या रिपोर्टनुसार काही अॅड्स 12 सेकंदाच्या आहेत.

यावरुन असे दिसून येते की, कंपनी ज्यास्तीत जास्त युजर्सना प्रीमियम मेंबरशिप घेण्यासाठी मजूबर कत आहे. प्रीमियमसाठी ग्राहकांना महिन्याला 129 रुपयापर्यंत खर्च करावे लागतात. परंतू, अनेक युजर्स यासाठी अॅड-ब्लॉकर एक्सटेंशनचा वापर करतात. अॅड-ब्लॉकरमुळे यूट्यूबवर अॅड्स दिसत नाहीत.