एका क्लिकवर होणार काम! IRCTC च्या नवीन 'सुपर ॲप'मध्ये काय काय असणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:35 IST
1 / 6भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी नवीन ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपची चर्चा आहे. या एका ॲपमुळे प्रवासाशी संबंधित अनेक ॲपची गरज संपणार आहे. तिकीट बुकिंग करण्याबरोबरच इतरही अनेक सेवा या ॲपमध्ये असणार आहे.2 / 6भारतीय रेल्वेच्या नवीन ॲपचे नाव IRCTC Super App आहे. क्रीस आणि आयआरसीटीसीने विकसित केलेल्या ॲपमध्ये तिकीट बुकिंगपासून ते सामान पाठवण्यापर्यंतच्या सेवा असणार आहे.3 / 6आयआरसीटीसी सुपर ॲप लवकर लॉन्च केले जाणार आहे. हे ॲप प्रवाशांच्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून तयार करण्यात आले आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर आता प्रवाशांना सेवा मिळणार आहे. 4 / 6रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेचे हे नव्या वर्षात लॉन्च केले जाणार आहे. या ॲपद्वारे तिकीट बुक करण्याबरोबर जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकिटही बुक करता येणार आहे.5 / 6वेगवेगळ्या तिकीट बुकिंगशिवाय रेल्वे गाड्यांचे रिअल टाईम ट्रेकिंग, कॅटरिंग सेवा आणि इतर सेवा मिळवता येणार आहे. त्याचबरोबर यूजर्संना या ॲपवरून फीडबॅकही देता येणार आहे.6 / 6या ॲपमुळे भारतीय रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे इतर ॲप वापरण्याची गरज पडणार नाही. म्हणजे आता आयआरसीटीसी, यूटीएस आणि रेल मदत यासारखे ॲप ठेवावे लागणार नाहीत.